वक्फ बोर्ड ED: ‘मरणाला घाबरत नाही, तुरुंगात जायला घाबरत नाही..’ नवाब मलिकांचं थेट आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘मला सुरुवातीला काही जणांनी सांगितलं की, वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले आहेत. पण मला मिळालेल्या माहितीनुसार वक्फ बोर्डावर छापे पडलेले नाहीत. त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरावर किंवा कार्यालयावर छापे पडले आहे.’ अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

‘मला बदनाम करण्यासाठी कट-कारस्थान होत असेल तरीही मी घाबरणार नाही. नवाब मलिक मरणाला घाबरत नाही, तुरुंगात जायला घाबरत नाही..’ असं म्हणत मलिकांनी विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे.

पाहा नवाब मलिक यांनी ईडीच्या छापेमारीवर नेमकं काय म्हटलंय

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आम्हीच 7 ट्रस्टविरोधात तक्रार दिलीए’

‘आपल्याला सांगू इच्छितो की, मुळशी ताबूत एंडोन्मेट ट्रस्ट पुणे येथे एक भूसंपादन जे एमआयडीसीने केलं होतं 5 हेक्टरवर.. त्याच्या बनावट कागदपत्रांच्या आधारावर जवळपास 7 कोटी रुपये चाँद मुलानी याने स्वत:च्या अकाउंटमध्ये हे पैसे मिळाले होते. वक्फ बोर्डाला ही माहिती मिळाल्यानंतर वक्फ बोर्डाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरने 13 ऑगस्ट 2021 रोजी पत्राद्वारे बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी लेखी तक्रार पाठवली होती.’

ADVERTISEMENT

‘बंडगार्डन पोलीस स्टेशनने ती तक्रार त्या दिवशी घेतली नाही. तेव्हाच मला अनिस शेख यांचा फोन आल्यानंतर मी अमिताभ गुप्ता यांना फोन केल्यानंतर सांगितलं विषय गंभीर आहे. तात्काळ एफआयआर दाखल करा. त्यानंतर एफआयआर दाखल झाली. त्याप्रकरणी 5 जणांना अटक झाली.’

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर फक्त एकच एफआयआर दाखल झालेलं नाही. एकूण सात एफआयआर आम्ही दाखल केलेले आहेत. एकंदरीत पारदर्शी कारभार करण्याच्या क्लिन अप अभियान आम्ही सुरु केलेलं आहे. पण या ताबूत ट्रस्टच्या प्रकरणामध्ये काही लोकांनी माहिती दिली की, सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. छान आहे… आम्ही त्यांचं स्वागत करु. त्यांना हवे असतील तर सात प्रकरणं देऊ.’ अशी माहिती मलिकांनी दिली आहे.

‘कट-कारस्थान होत असेल तर नवाब मलिक कोणालाही घाबरणार नाही’

‘मी त्यांना विनंती करतोय की, 30 हजारपेक्षा जास्त ट्रस्ट आमच्याकडे रजिस्टर आहेत. सर्व क्लीन अप अभियानात ईडीने पण आम्हाला मदत करावी. पण ज्या पद्धतीने बातमी पेरण्यात आली की, ईडीच्या कारवाया या वक्फ बोर्डमध्ये सुरु झाल्या. नवाब मलिकच्या अडचणीत वाढ होणार. मला वाटतं बदनाम करण्यासाठी कुठलंही कट-कारस्थान होत असेल तर नवाब मलिक कोणालाही घाबरणार नाही.’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

‘नवाब मलिक मरणाला घाबरत.. तुरुंगात जायला घाबरत नाही.’

‘तुम्ही तपास करा.. पुन्हा ईडीचा वापर करुन नवाब मलिक गप्प राहिल असं वाटत असेल तर ते होणार नाही. जी यंत्रणा कायद्या गैरवापर करुन लोकांना त्रास देते, तुरुंगात टाकते.. विरोधी पक्ष नेते म्हणतात अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल. भाजपचे लोकं सोशल मीडियावर पोस्ट टाकतायेत नवाब मलिक आता तुरुंगात जाणार आहे. त्यांना कळत नाही की.. नवाब मलिक मरणाला घाबरत.. तुरुंगात जायला घाबरत नाही.’

‘तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती करा. तुम्ही ईडी पाठवली, सीबीआय-एनआयए पाठवा.. जे काही आहे तुम्ही माझ्या मागे लावा.. पण या राज्यात मी जो काही लढा निर्माण केलेला आहे तो मी अजिबात थांबवणार नाही.’ अस थेट आव्हानच मलिकांनी यावेळी दिलं आहे.

‘माझ्या घरी छापा टाकायचा असेल तरीही मी सहयोग करेन’

‘माझ्या घरी छापा टाकायचा असेल तरीही मी पूर्ण सहयोग करायला तयार आहे. पण या प्रकारे काही लोकं बोलतायेत. मी सांगतो यात तपास झाल्यावर भाजपचे काही नेते देखील तुरुंगात जाणार आहेत. सखोल तपास हा या वक्फ खात्याचा झाला पाहिजे. काही मुंबईत बसलेले लोकं तुरुंगात जाऊ शकतात. ईडीचं आम्हाला सहयोग मिळतोय त्यासाठी आभारी आहोत.’ असंही मलिक यावेळी म्हणाले.

‘ईडीने प्रेस नोट काढून छापेमारीची माहिती द्यावी’

‘मी पुन्हा सांगतो की, छापे हे वक्फ बोर्डावर पडलेले नाहीत. एक कॅम्पेन सुरु आहे ते माझी प्रतिमा खराब करण्याचा आणि घाबरविण्याचा प्रयत्न करत आहेत. चुकीच्या बातम्यांनी कोणाची छबी खराब होणार नाही. ईडीने याबाबत अधिकृत पत्रक काढावं. काय देवेंद्र फडणवीसांनी याबाबत तक्रार केली आहे?.. मला वाटतं ईडीने सूत्रांकडून बातम्या पसरविण्याऐवजी तात्काळ प्रेस नोट काढून देशाला माहिती द्यावी.’ अशी मागणी मलिकांनी केली आहे.

वक्फ बोर्डाच्या पुणे आणि औरंगाबाद येथील कार्यालयांवर ईडीचे छापे, नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?

‘केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने घाबरविण्याचा प्रयत्न’

‘केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण महाराष्ट्राचे मंत्री, नेते आणि कार्यकर्ते त्याला घाबरणार नाही. आजच सांगतो आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलं आहे. ज्या काही ईडीकडे तक्रारी आहेत त्याबाबत एक कव्हरिंग लेटर तयार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक शिष्टमंडळ सगळे प्रकरण घेऊन ईडी कार्यालयात जाणार आहे. हे तपास का थांबलेले आहेत, या तपासाला तुम्ही गती का देत नाही? आगामी काळात सगळी माहिती आम्ही ईडीला देणार आहोत.’

‘जे भाजपमध्ये गेलेले नेते आहे ज्यांच्यावर ईडीकडे तक्रारी दाखल आहेत त्या प्रकरणाचा तपास गतिमान व्हावा यासाठी आम्ही ईडीकडे जाणार आहोत.’ असं नवाब मलिक हे यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT