वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ‘या’ जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वर्धा: महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच चिंता देखील व्यक्त केली होती. याच सगळ्या दरम्यान आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आता जिल्ह्यात जमाव बंदी आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत. तसेच लग्न व इतर कार्यक्रमांसाठी 50 व्यक्तींचे बंधन देखील असणार आहे. त्यामुळे आता गेल्यावेळेस प्रमाणेच पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यात नागरिकांवर बंधनं असणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जाणून घ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात असणार काय नियम व अटी

  1. मेडिकल व रुग्णालये सोडून इतर दुकाने व बाजारपेठा सायंकाळी 7 पर्यंत सुरू

ADVERTISEMENT

  • लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाकरिता संबधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक 

  • ADVERTISEMENT

  • मिरवणुक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध 

  • मंगल कार्यालये, हॉटेल्स, कॉन्फरन्स रुम व तत्सम गर्दीच्या ठिकाणी नियमांचा भंग केल्याचे प्रतिष्ठाने सील होतील.

  • रेस्टॉरंट व हॉटेल्स रात्री 9 वाजेपर्यंत चालू राहतील

  • जिल्हयामध्ये १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.

  • यापूर्वीच सुरु असणाऱ्या इतर शैक्षणिक संस्था, महाविद्यालये पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.

  • ही बातमी देखील जरूर पाहा: पुन्हा लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

    पाहा कोणत्या कृतीसाठी किती दंड आकारला जाणार?

    1. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 500 रुपये दंड

    2. सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न लावणे दंड 200 रुपये दंड

    3. विक्रेत्यांने मार्कींग न करणे यासाठी प्रति व्यक्ती 200 रुपये दंडात्मक कारवाई

    अशा स्वरुपाचे आदेश वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT