वर्ध्यातल्या रूग्णालयामागे 11 कवट्या आणि 54 हाडं मिळाल्याने खळबळ, महिला डॉक्टर आणि नर्सही ताब्यात

मुंबई तक

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिचा अवैधरित्या गर्भपात केल्याचं प्रकरण वर्धा जिल्ह्यात गाजतं आहे. ज्या रुग्णालयात 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात करण्यात आला, त्या इमारतीच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी 11 कवट्या आणि 54 हाडं असे अवशेष सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिचा अवैधरित्या गर्भपात केल्याचं प्रकरण वर्धा जिल्ह्यात गाजतं आहे. ज्या रुग्णालयात 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात करण्यात आला, त्या इमारतीच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी 11 कवट्या आणि 54 हाडं असे अवशेष सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरला आधीच अटक करण्यात आली होती. आता डॉक्टर रेखा कदम यांच्या सासू आणि परिचारिकेलाही ताब्यात घेतले आहे. पीडितेचा 30 हजार रुपयांत अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप डॉ. रेखा कदम यांच्यावर आहे. मात्र डॉ. कदम यांनी यापूर्वीही अनेक गैरप्रकार केल्याची चर्चा खरी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

आर्वी पोलिसांनी महिला डॉक्टरसह तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केलं असता अल्पवयीन मुलाच्या आई आणि वडिलांची कारागृहात रवानगी करण्यात आली, तर डॉ. रेखा कदम यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती.

सहा जानेवारीला अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. मुळात गर्भपातासाठी लागणारा परवाना डॉ. रेखा कदम यांच्याकडे आहे का, असा सवाल विचारला जात आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुलगी अल्पवयीन असल्यामुळे गर्भपाताआधी पोलिसांना कळवणं आवश्यक होतं, मात्र तशी कुठलीही पूर्वकल्पना न देता अवैधरित्या तिचा गर्भपात केल्याचं उघड झालं आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅस टाकीत 11 कवट्या आणि 54 हाडं असं बायोमेडिकल वेस्ट (जैविक कचरा) सापडल्याने याआधी इथे आणखी अवैध प्रकार घडल्याचा संशय बळावला आहे.

डॉक्टरांची सासू आणि नर्सही ताब्यात