वर्धा: ‘त्या’ रुग्णालयात सापडल्या आणखी काही कवट्या, नेमकं प्रकरण काय?
सुरेन्द्र रामटेके, वर्धा: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिचा अवैधरित्या गर्भपात केल्याचं प्रकरण वर्धा जिल्ह्यात समोर आलं होतं. त्याप्रकरणी डॉक्टर रेखा कदम हिला अटक करण्यात आलं होतं. पण तिच्या अटकेनंतर या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. रेखा कदम हिच्या रुग्णालय परिसरातून मोठ्या कवट्या आणि हाडं सापडत आहेत. आता पुन्हा एकदा काही कवट्या आणि हाडं […]
ADVERTISEMENT

सुरेन्द्र रामटेके, वर्धा: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिचा अवैधरित्या गर्भपात केल्याचं प्रकरण वर्धा जिल्ह्यात समोर आलं होतं. त्याप्रकरणी डॉक्टर रेखा कदम हिला अटक करण्यात आलं होतं. पण तिच्या अटकेनंतर या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. रेखा कदम हिच्या रुग्णालय परिसरातून मोठ्या कवट्या आणि हाडं सापडत आहेत. आता पुन्हा एकदा काही कवट्या आणि हाडं आढळून आल्याने संपूर्ण वर्धा जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.
संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या आर्वी शहरात अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर आलेल्या कदम रुग्णालयात काल (14 जानेवारी) पुन्हा खोदकाम करण्यात आले. सुमारे पाच तास रुग्णालय परिसरात हे खोदकाम सुरु होते. शोधकार्यात पुन्हा एक कवटीसारखा अवयव आढळल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.
तसेच ब्लड सँपलसह काही साहित्य मिळाले आहे. याबाबत वर्धा आणि नागपूर येथील फॉरेन्सिक टीमने रुग्णालयाची पूर्ण पाहणी सुद्धा केली आहे. याआधी रुग्णालय परिसरातील गॅस चेंबरमध्ये 11 कवट्या आणि 54 हाडे सापडली होती. आतापर्यंत या परिसरातून 12 कवट्या आणि 54 हाडे आढळली आहे.
रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅस टाकीत 11 कवट्या आणि 54 हाडं असं बायोमेडिकल वेस्ट (जैविक कचरा) सापडल्याने याआधी इथे आणखी अवैध प्रकार घडल्याचा संशय बळावला आहे.