अमरावती हिंसाचारामागे भाजपचा हात होता? काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावती, मालेगाव, नांदेड या ठिकाणी त्रिपुरा मध्ये घडलेल्या कथित घटनेचे पडसाद उमटले. या सगळ्या घटना आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचं गृह खातं हे सातत्याने चर्चेत आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप, त्यामुळे त्यांना सोडावं लागलेलं गृहमंत्रीपद त्यानंतर दिलीप वळसे पाटील गृहमंत्री होणं या […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावती, मालेगाव, नांदेड या ठिकाणी त्रिपुरा मध्ये घडलेल्या कथित घटनेचे पडसाद उमटले. या सगळ्या घटना आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचं गृह खातं हे सातत्याने चर्चेत आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप, त्यामुळे त्यांना सोडावं लागलेलं गृहमंत्रीपद त्यानंतर दिलीप वळसे पाटील गृहमंत्री होणं या सगळ्या घडामोडी गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दोन वर्षे पूर्ण होतील. त्याच निमित्ताने इंडिया टुडेचे सीनियर एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
महाराष्ट्रात दंगेसदृश परिस्थिती आहे की? परिस्थिती नियंत्रणात आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘अमरावती, नांदेड आणि इतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी आता परिस्थिती आटोक्यात आहे. शांतता प्रस्थापित झालेली आहे. आता प्रश्न राहतो तो की अशा घटना का घडल्या. त्यामध्ये तपास सुरू आहे पण एक घटना बांगलादेशात घडली, त्याची प्रतिक्रिया त्रिपुरात उमटली. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी काही संघटना 12 नोव्हेंबरला गेल्या होत्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपतर्फे बंद पुकारला गेला होता.’