Nawab Malik: नवाब मलिक हाजिर हो... वाशिम जिल्हा न्यायालयाचा आदेश

Nawab Malik: समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना वाशिम जिल्हा न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Nawab Malik: नवाब मलिक हाजिर हो... वाशिम जिल्हा न्यायालयाचा आदेश
washim district judge orders ncp minister nawab malik to appear in court(फाइल फोटो)

वाशिम: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 13 डिसेंबर रोजी वाशिम जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करु नोकरी मिळविली त्यामुळे त्यांची नोकरी जाणार. असं वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं होतं.

मात्र त्यांच्या नातेवाईकांसह समीर वानखडेंजवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याने त्याचे चुलतभाऊ संजय वानखडे यांनी वाशिम शहर पोलिसांत ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नवाब मलिक यांना 13 डिसेंबर रोजी वाशिम कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी नवाब मलिक यांना आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

समीर वानखडे यांचे चुलतभाऊ संजय वानखडे यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांच्या विरूध्द अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत वाशिम येथील न्यायालयामध्ये एका याचिकेद्वारे मागणी केली होती.

याबाबत याचिकाकर्ते संजय वानखडे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उदय देशमुख यांनी न्यायालयामध्ये जोरदार युक्तीवाद केला. तेव्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी नबाब मलिक यांना आपली बाजू मांडण्यासाठी 13 डिसेंबर रोजी वाशीम न्यायालयात हजर राहावे असा आदेश दिले आहेत.

washim district judge orders ncp minister nawab malik to appear in court
नवाब मलिक यांना आता 1 हजार कोटीच्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी द्यावं लागणार उत्तर

या प्रकरणात नबाब मलिक त्यांची बाजू मांडण्यासाठी वाशिम न्यायालयात येणार का? याकडे आता वाशिम जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत काहीही वक्तव्य करण्यास किंवा त्यासंबंधी सोशल मीडियावर काहीही शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाशिम कोर्ट मलिक यांना नेमका कोणता आदेश देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in