नक्षलवादी बनण्याआधी मिलिंद तेलतुंबडे नेमकं काय करायचा?
भास्कर मेहरे, यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्र अंतर्गत हिंडकोटोला-रानकट्टा जंगल परिसरात शनिवारी (14 नोव्हेंबर) सकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तुफान चकमक झाली. ज्यामध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. याचवेळी नक्षलवाद्यांचा नेता समजला जाणारा मिलिंद तेलतुंबडे हा देखील ठार झाला. याच मिलिंद तेलतुंबडेवर तब्बल 50 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आता त्याच्या […]
ADVERTISEMENT

भास्कर मेहरे, यवतमाळ
गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्र अंतर्गत हिंडकोटोला-रानकट्टा जंगल परिसरात शनिवारी (14 नोव्हेंबर) सकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तुफान चकमक झाली. ज्यामध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. याचवेळी नक्षलवाद्यांचा नेता समजला जाणारा मिलिंद तेलतुंबडे हा देखील ठार झाला. याच मिलिंद तेलतुंबडेवर तब्बल 50 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आता त्याच्या नातेवाईकांनी तो नक्षलवादी बनण्याआधी नेमकं काय करायचा याची माहिती दिली आहे.
1996 साली गाव सोडून गेलेला मिलिंद तेलतुंबडे हा पुन्हा गावात परतलाच नाही. त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण हे यवतमाळ जिल्ह्याच्या राजुरा गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले होते. त्यानंतर तो शिक्षणसाठी वणी येथे गेला. त्याला चार भाऊ आणि तीन बहिणी आहे. मिलिंद तेलतुंबडे हा सहावा नंबरचा घरात होता.
मिलिंद तेलतुंबडे संदर्भात बोलण्यास गावकऱ्यांनी नकार दिल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र, काल गडचिरोली मधील धानोरा तालुक्यातील जंगलात पोलिसांच्या सात पथक शोध अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी अचानक सी60 पथकावर गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं त्यात नक्षली संघटनेचा मोठा नेता म्हणून ओळख असलेला मिलिंद तेलतुंबडे हा ठार झाला.