Love trauma syndrome : ब्रेकअपनंतर होणारा आजार… अक्षरशः मोडून पडतात लोकं
Love trauma syndrome : प्रेम म्हणजे सजीव प्राण्याला मिळालेली एक निरायम भावना. मनुष्य असो की प्राणी, प्रत्येक जण कोणावर तरी प्रेम करत असतो, आधार, पाठिंबा शोधत असतो. असं म्हणतात की, प्रेमात असतो तेव्हा आपल्या जगण्याच्या पद्धती बदलतात. आपल्या जोडीदाराच्या बरोबरीने आपण एका सुंदर स्वप्नासारखे आयुष्य जगत असतो. जगातील सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट वाटू लागते. […]
ADVERTISEMENT

Love trauma syndrome :
प्रेम म्हणजे सजीव प्राण्याला मिळालेली एक निरायम भावना. मनुष्य असो की प्राणी, प्रत्येक जण कोणावर तरी प्रेम करत असतो, आधार, पाठिंबा शोधत असतो. असं म्हणतात की, प्रेमात असतो तेव्हा आपल्या जगण्याच्या पद्धती बदलतात. आपल्या जोडीदाराच्या बरोबरीने आपण एका सुंदर स्वप्नासारखे आयुष्य जगत असतो. जगातील सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट वाटू लागते.
पण कधी कधी अशी वेळ येते की जगातील सर्वात जास्त आनंद देणारी ही गोष्ट सर्वात जास्त दुःख देऊन जाते. प्रेमात असा काही टर्निंग पॉईंट येतो जिथं हे सुंदर नातं अखेरच्या घटका मोजायला लागत. ज्याच्यासोबत साथ देण्याची शपथ घेतलेली असते ते हात हळू हळू सुटायला लागतात. याच गोष्टीला आजच्या काळात ब्रेकअप असं म्हणतात. (What exactly is love trauma syndrome? What is this disease? And the way to save yourself from it)
प्रेम माणसाला जितकी उर्जा देते ब्रेकअप तितकचं रितेपण देतं. ब्रेकअपनंतर वेळेनुसार काही लोकं सावरतात. पण सर्वांजवळचं हा प्रॅक्टिकल दृष्टीकोन असतोच असं होतं नाही. अनेकांसाठी ब्रेकअप हा मनावर मोठा आघात करणारा असतो. नातं तुटण्याचं दु:ख त्यांना आतून अक्षरशः मोडून टाकतं. त्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात मोठे बदल होतात.