मोदी सरकारच्या निर्णयानंतर तुमच्या शहरात पेट्रोलचा नेमका भाव काय?, आजपासून किती रुपयांना मिळणार?

मुंबई तक

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) जनतेला दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर एक गिफ्ट दिलं आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर हे प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकाराने आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात ताबडतोब कपात केली आहे. त्यामुळे दिवाळीत सामान्य नागरिकांना मोठा दिलासा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) जनतेला दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर एक गिफ्ट दिलं आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर हे प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकाराने आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात ताबडतोब कपात केली आहे. त्यामुळे दिवाळीत सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारने घेतलेला हा निर्णय आजपासून (4 नोव्हेंबर) संपूर्ण देशात लागू होणार आहे. यावेळी पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 5 रूपये तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रूपयांनी कमी करण्यात आलं आहे.

दरम्यान, असं असलं तरी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात पेट्रोलचे वेगवेगळे दर आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्या शहरात पेट्रोल किती दर आहेत आणि सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल किती स्वस्त होणार हे पाहूयात सविस्तरपणे.

पेट्रोलचे आजचे (४ नोव्हेंबर) दर