कांदे-भुजबळ वादाचा परिणाम काहीही होवो पालकमंत्री भुजबळच असणार-जयंत पाटील

मुंबई तक

राजकारणात अनेकदा वाद होतात, वादाचा काहीही परिणाम होवो नाशिकच्या पालकमंत्रीपदी छगन भुजबळच राहणार आहेत असं वक्तव्य करत जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच सुहास कांदे-छगन भुजबळ वादावर भाष्य केलं आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निहाय बैठका घेत आहेत. यावेळी निफाड विधानसभा कक्षेत्रातील बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राजकारणात अनेकदा वाद होतात, वादाचा काहीही परिणाम होवो नाशिकच्या पालकमंत्रीपदी छगन भुजबळच राहणार आहेत असं वक्तव्य करत जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच सुहास कांदे-छगन भुजबळ वादावर भाष्य केलं आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निहाय बैठका घेत आहेत. यावेळी निफाड विधानसभा कक्षेत्रातील बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले राजकारणात असे वाद होत असतात, वादाचा परिणाम काहीही असो नाशिकच्या पालकमंत्री पदी भुजबळच असणार आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ वादात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत भूमिकेत भुजबळ यांनी पाठराखण केली आहे.

नाशिकमधील जलसंपदा कार्यालय कुठेही जाणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया.

नाशिकमधील जलसंपदा विभागाचे कार्यालय कुठेही हलणार नाही. जलसंपदा मंत्री म्हणून मी अशी नाशिककरांना ग्वाही देतो असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. नाशिकमधील जलसंपदा विभागाच्या कामांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp