कोण आहे गौतम अदाणी यांची पत्नी? लग्नापूर्वी करायची ‘हा’ जॉब

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gautam Adani Wife Priti Adani: मुंबई: काही दिवसांपूर्वीपर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदाणी (Gautam Adani) हे प्रचंड चर्चेत आले होते. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याला मोठा हादरा बसला. पण असं असलं तरीही गौतम अदाणी यांच्या वैयक्तिक आयुष्यबाबत फारशा गोष्टी समोर आलेल्या नाहीत. पण आम्ही आपल्याला गौतम अदाणींच्या पत्नीविषयी सांगणार आहोत. अदाणी आपल्या पत्नीला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ म्हणतात. अदाणी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रीती अदाणी (Priti Adani) यांनी आपल्या प्रगतीसाठी आपले करिअर पणाला लावले. (who is gautam adanis wife priti adani is doctor before marriage)

पत्नीसोबतच्या पहिल्या भेटीत अदाणी काय म्हणालेले?

गौतम अदाणी आणि प्रीती यांचं अरेंज मॅरेज झालं आहे. पहिल्या भेटीबाबत अदाणी यांनी सांगितले होते की ते खूप लाजाळू होते. अदाणी म्हणाले होते, मी एक अशिक्षित माणूस आहे आणि ती डॉक्टर.. त्यामुळे नैसर्गिकरित्या काही गोष्टी जुळत नव्हत्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचे लग्न त्यांच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या लोकांनी ठरवलं होतं. प्रीती यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांचा जन्म मुंबईतील आहे. त्यानंतर त्या अहमदाबादला आल्या. काही काळ त्या आपल्या कुटुंबासह अमेरिकेतही राहिल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रीती अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी अहमदाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. मात्र लग्नानंतर त्यांना करिअर सोडावे लागले. 1996 मध्ये लग्नानंतर त्या गौतम अदाणी यांच्या NGO अदाणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा झाल्या.

मात्र, प्रीती यांना आपलं करिअर सोडावं लागलं याचं फार दु:ख नाही. आपल्या पतीच्या 60व्या वाढदिवसानिमित्त फोटो ट्विट करत त्यानी असं लिहलं होतं की, ’36 वर्षांहून अधिक काळ झाला आहे… मी माझे करिअर बाजूला ठेवले आणि गौतम अदाणींसोबत एक नवीन प्रवास सुरू केला. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला त्यांच्याबद्दल अपार आदर आणि अभिमान वाटतो.’

ADVERTISEMENT

एका मुलाखतीत प्रीती अदाणी म्हणाल्या होत्या की, जेव्हा त्या निराश असतात तेव्हा गौतम अदाणी त्यांना प्रोत्साहन देतात आणि कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्यासाठी उत्तम कल्पना देतात. दंतचिकित्सक बनून काही लोकांची सेवा करता आली असती पण फाऊंडेशनमध्ये सहभागी होऊन लाखो लोकांची सेवा आपण करू शकू हे लक्षात आल्यावर त्यांनी आपलं करिअर सोडल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

Gautam Adani यांच्यासाठी पत्नीने सोडली मोठी गोष्ट… कोण आहेत प्रीती अदाणी?

‘प्रीतीने आपलं करिअर सोडून मला साथ दिली’

एवढं मोठं साम्राज्य उभारताना अदाणींना त्यांच्या पत्नीची चांगली साथ लाभली आहे. ते म्हणाले की, ‘प्रीती माझा आधारस्तंभ आहे अर्धास्तंभ आहे आणि ती कुटुंबाची, दोन मुलांची, माझ्या नातवंडांचीही काळजी घेत आहे. ती फाउंडेशनचे (अदाणी फाऊंडेशन) कामही सांभाळत आहे. तिचा वैद्यकीय व्यवसाय सोडून तिने मला पूर्ण पाठिंबा दिला. तिने कुटुंबाची काळजी घेतली, मुलांचे संगोपन केले आणि मुलं मोठी झाल्यावर तिने फाउंडेशनची जबाबदारी घेतली.’

आपल्या पत्नीचे कौतुक करताना अदाणी पुढे म्हणाले, ‘आज मी आतून समाधानी आहे की प्रीती फाउंडेशनसाठी जास्तीत जास्त काम करत आहे. दररोज 7-8 तास ती देते. प्रीतीच्या देखरेखीखाली फाऊंडेशनचा खूप विकास झाला आहे.’

गौतम अदाणी यांनी सांगितले की ते आठवड्यातून तीन दिवस अहमदाबादच्या बाहेर राहतात आणि जेव्हा ते चार दिवस शहरात असतात तेव्हा ते ऑफिसला उशिरा जातात जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाला वेळ देता येईल. ते पुढे सांगतात, ‘मी रात्री ऑफिसमधून घरी गेल्यावर प्रीतीसोबत रमी, पत्ते खेळतो. मी 8-10 फेऱ्या खेळतो आणि बहुतेक वेळा ती जिंकते.’

Exclusive: मोदींमुळे तुमची भरभराट झाली?, गौतम अदाणी म्हणाले हे तर..

अदाणी फाऊंडेशनला पुढे नेण्यात प्रीती अदाणी यांचा मोठा वाटा

अदाणी फाऊंडेशनची स्थापना झाली तेव्हा केवळ दोन कर्मचारी होते. पण आज फाऊंडेशनने दावा केला जातो की, भारतभरात दरवर्षी 32 लाख लोकांना मदत करते. यामध्ये प्रीती अदाणी यांचा मोठा वाटा आहे.

फाउंडेशन चार मुख्य क्षेत्रांमध्ये कार्य चालतं: शिक्षण, सामुदायिक आरोग्य, शाश्वत उपजीविका विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास.

फाऊंडेशन सांभाळण्याव्यतिरिक्त प्रीती आणखी काय करतात?

प्रीती त्यांचा जास्तीत जास्त वेळ फाउंडेशनसाठी देतात. त्यांना फावल्या वेळात पुस्तके वाचायला आणि नवीन तंत्रज्ञान शिकायला आवडतं. त्या म्हणतात की, स्टार्ट अप्स त्यांना नवीन कल्पना आणि प्रेरणा देतात. तसेच प्रीती अदाणींना बागकामाचीही खूप आवड आहे.

NCP नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात अंबानी-अदाणी, 35 विमानांतून आले पाहुणे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT