फेसबुक आणि इंस्टाग्राम यांनी महिन्याभरात दोन कोटींपेक्षा जास्त पोस्ट का डिलिट केल्या?
इंस्टाग्राम आणि फेसबुक ही दोन अत्यंत प्रचलित सोशल मीडिया माध्यमं आहेत. या दोन्ही माध्यमांचा वापर करत नाही अशा व्यक्ती जगभरात कमीच असतील. तरूणांकडून या दोन्ही माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. फेसबुक आणि इंस्टा रिल्सही तरूणाईत चांगलीच प्रचलित आहेत. अशात फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही समाज माध्यमांनी महिन्याभरात दोन कोटींहून अधिक पोस्ट डिलिट केल्या आहेत. […]
ADVERTISEMENT

इंस्टाग्राम आणि फेसबुक ही दोन अत्यंत प्रचलित सोशल मीडिया माध्यमं आहेत. या दोन्ही माध्यमांचा वापर करत नाही अशा व्यक्ती जगभरात कमीच असतील. तरूणांकडून या दोन्ही माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. फेसबुक आणि इंस्टा रिल्सही तरूणाईत चांगलीच प्रचलित आहेत. अशात फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही समाज माध्यमांनी महिन्याभरात दोन कोटींहून अधिक पोस्ट डिलिट केल्या आहेत.
फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयटी अॅक्ट २०२१ अंतर्गत कारवाई
फेसबुक आणि इंस्टाग्रामने आयटी अॅक्ट २०२१ अंतर्गत दोन कोटींहून अधिक पोस्ट मागच्या महिन्याभरात डिलिट केल्या आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. दरवेळी त्यांचा हेतू हा निखळ मनोरंजन इतकाच नसतो. अनेकदा धर्माविषयी टिपण्णी करणाऱ्या, द्वेष पसवरणाऱ्या, विशिष्ट समाजाबाबत द्वेष पसरवणाऱ्या पोस्टही केल्या जातात. अशात दोन कोटींहून अधिक पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामने डिलिट केल्या आहेत.
फेसबुक वापरता? मग आधी ‘हे’ काम करा, नाहीतर अकाऊंट होईल लॉक