अमरावतीमध्ये अचानक का वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या?
अमरावती: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमरावतीमध्ये सोमवारी (22 फेब्रुवारी) रात्री ८ वाजल्यापासून ते १ मार्चपर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावलं आहे. अनलॉकनंतर संपूर्ण राज्यात लॉकडाउन लागलेला हा एकमेव जिल्हा आहे. अमरावतीमध्ये लॉकडाउन लावण्यासाठी कारण ठरलं ते इथे वेगाने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या. अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतक्या वेगाने का वाढतेय हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. ‘मुंबई तक’ने […]
ADVERTISEMENT

अमरावती: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमरावतीमध्ये सोमवारी (22 फेब्रुवारी) रात्री ८ वाजल्यापासून ते १ मार्चपर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावलं आहे. अनलॉकनंतर संपूर्ण राज्यात लॉकडाउन लागलेला हा एकमेव जिल्हा आहे. अमरावतीमध्ये लॉकडाउन लावण्यासाठी कारण ठरलं ते इथे वेगाने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या. अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतक्या वेगाने का वाढतेय हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. ‘मुंबई तक’ने देखील याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय याची कारणं जाणून घेण्यासाठी मुंबई तकने अमरावतीचे आयुक्त पियुष सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी मृत्यूदरात वाढ झालेली दिसत नाही नाही. उलट गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात मृत्यूदर कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली तर अमरावतीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 50 टक्क्यांनी वाढला आहे. पण मृत्यूदर जानेवारी महिन्यात 0.86 टक्के होता तो गेल्या 21 दिवसात 0.57 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील रुग्णांची संख्या वाढलेली दिसतेय. रुग्ण वाढीचं नेमकं कारण काय याबद्दल सध्या तरी काही माहिती नाही. असं आयुक्तांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. सगळीकडे रुग्णवाढीची जी कारणं दिसताहेत तीच कारणं इथेही सांगता येतील असं आयुक्तांचं म्हणणं आहे. ज्यानुसार लोकांनी मास्क न वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि सेशल डिस्टन्सिंग न पाळणं वगैरे कारणामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशी माहिती आयुक्त पियुष सिंग यांनी दिली.
दुसरीकडे आयुक्त पियुष सिंग यांचं म्हणणं आहे की, रुग्णांची वाढती संख्या आणि वेग लक्षात घेऊन अमरावतीतील काही रुग्णांचे सॅम्पल्स हे अमरावती प्रयोगशाळेतून एनआयव्हीला तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचे रिपोर्ट आले की स्ट्रेन बदलला आहे काय़ हे कळेल. सध्या अमरावतीमधील ५ सॅम्पल्स आणि यवतमाळमधील ५ सॅम्पल्स एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या वाढत्या रुग्णसंख्येत एकच बाब लक्षात आलीय ती म्हणजे कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोना झाला की इतर व्यक्तींची चाचणी केली असता त्यांचेही सॅम्प्ल्स पॉझिटिव्ह येऊ लागले आहे. हे पूर्वी कधी फारसं पाहायला मिळालं नव्हतं. असं अमरावतीचे आयुक्त म्हणाले.