RSS विरोधात ED आणि IT मध्ये का करण्यात आली तक्रार? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

किरण तारे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, किरण तारे

Rss अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात सक्तवसुली संचलनालय आणि इन्कम टॅक्स विभाग या दोन्ही विभागात तक्रार करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी ही तक्रार केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ट्विटर अकाऊंट हे @RSSorg या नावाने आहे. या अकाऊंटवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 20 मे 2020 पर्यंत 1 कोटी पेक्षा जास्त लोकांना रेशन किट, सात कोटी लोकांना जेवणाची पाकिटं, 27 लाख लोकांना प्रवासी श्रमिक मदत, 13 लाख इतर प्रांतातील लोकांना मदत असं सगळं दाखवलं आहे. या सगळ्यावर झालेला खर्च हा साधारण 1 हजार कोटींच्या घरात आहे. याबाबत जबलपुरे यांचं म्हणणं आहे की ज्या संस्थेचं बँक अकाऊंटही नाही आणि लॉकडाऊन मध्ये जर कुणीही घराच्या बाहेर पडू शकत नव्हतं तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतके पैसे कुठून जमवले?

ADVERTISEMENT

जबलपुरे यांनी काय म्हटलं आहे?

ADVERTISEMENT

इतकी सगळी मदत केल्याचा आणि निधी गोळा केल्याचा जुमला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रचला आहे की हे सगळं खरं आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत जबलपुरे यांन धर्मदाय आयुक्तांकडे आणि आयटी तसंच ईडीकडे तक्रार केली आहे. मात्र धर्मदाय आयुक्तांनी ही तक्रार फेटाळली आहे. या संस्थेवर कारवाई करणं हे आमच्या प्राधिकरण क्षेत्रात येत नाही असं धर्मदाय आयुक्तांनी म्हटलं आहे.

अशात प्रश्न हा निर्माण होतो आहे की आरएसएसने एक हजार कोटी रूपये कुठून जमवले की हा सगळा बनाव रचला? जर इतका पैसा गोळा केला असेल तर त्यांनी करचोरीही केली असावी म्हणूनच आयकर विभागाकडेही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सामाजिक कार्य करणं, लॉकडाऊन मध्ये लोकांना मदत करणं यात गैर काहीही नाही. मात्र या सगळ्या परिस्थिती एखादी संस्था जिची नोंदणी नाही ती जर गैरव्यवहार करत असेल तर याच्या तथ्यापर्यंत गेलं पाहिजे असं जबलपुरे यांनी म्हटलं आहे.

1930 पासून देशात Muslim समाजाची लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे, RSS प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य

RSS ने याबाबत काय स्पष्टीकरण दिलं आहे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही कुणाकडून कुठल्याच कारणासाठी पैसे गोळा करत नाही. लॉकडाऊन दरम्यान गोळा करण्यात आलेला निधी RSS जन कल्याण समिती आणि सेवाभारती यांच्या पुढाकाराने गोळा करण्यात आला होता. या संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या आहेत. त्यांची बँक खातीही आहे आणि कायद्याप्रमाणे त्यांचं ऑडिटही केलं जातं. जनकल्याण समिती आणि सेवा भारती सोबत काम करणारेही स्वयंसेवकच आहेत. संघ कुठल्याही हेतूसाठी पैसे गोळा करत नाही. संघ सामाजिक कार्यात योगदान देतो असं संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी मुंबई तकशी बोलताना स्पष्ट केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT