संजय राठोड मंत्रीमंडळ बैठकीला येणार का?

मुंबई तक

मुंबई तक : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप होऊ लागल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री संयज राठोड त्यानंतर नॉट रिचेबल येऊ लागले. आज (17 फेब्रुवारी) मंत्री मंडळाच्या बैठकीसाठी तरी संजय राठोड येणार का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आणखी वाचा – 4 मुद्द्यात समजून घ्या, संजय राठोड कोण आहेत? राठोड सध्या कुठे आहेत याची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई तक : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप होऊ लागल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री संयज राठोड त्यानंतर नॉट रिचेबल येऊ लागले. आज (17 फेब्रुवारी) मंत्री मंडळाच्या बैठकीसाठी तरी संजय राठोड येणार का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आणखी वाचा – 4 मुद्द्यात समजून घ्या, संजय राठोड कोण आहेत?

राठोड सध्या कुठे आहेत याची कोणालाच माहिती नाही. ना ते सरकारने दिलेल्या त्यांच्या ८ क या बंगल्यात गेलेत ना ते त्यांच्या गावच्या घरी गेले मग मंत्री संजय राठोड गेले कुठे असं सर्वजण विचारत आहेत. शिवसेनेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ते हजर राहतील का याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, त्या बैठकीला मंत्री राठोड आलेच नाहीत. तेव्हा आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीला तरी संजय राठोड येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

संजय राठोड हे गुरुवारी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे येणार होते अशी चर्चा होती. मात्र आता चर्चा आहे की संजय राठोड पोहरादेवी तिथेही येणार नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp