कोरोना रूग्ण वाढल्याने महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर
कोरोनाच्या व्हायरसला थांबवायचं असेल तर गर्दीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. राज्यात निर्बंध लावण्याचा आज तरी विचार नाही. मात्र कठोर निर्बंध लागू शकतात असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 100 टक्के लॉकडाऊनची आज तरी गरज नाही. मात्र जी परिस्थिती आहे ती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार आहोत. टास्क फोर्स आणि इतर महत्त्वाच्या घटकांशी चर्चा करून […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या व्हायरसला थांबवायचं असेल तर गर्दीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. राज्यात निर्बंध लावण्याचा आज तरी विचार नाही. मात्र कठोर निर्बंध लागू शकतात असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 100 टक्के लॉकडाऊनची आज तरी गरज नाही. मात्र जी परिस्थिती आहे ती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार आहोत. टास्क फोर्स आणि इतर महत्त्वाच्या घटकांशी चर्चा करून ते यातला निर्णय घेतील असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे चिंता निर्माण झाली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. फक्त RTPCR नाही तर अँटिजेन टेस्टवर भर देणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. अजित पवार, राजेश टोपे आणि टास्क फोर्सची महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. त्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही सगळी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य
राज्यात कोरोनाचे संकट गहिरं होताना दिसत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील, असं आरोग्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात ओमिक्रॉनच्या आणखी 75 रुग्णांची नोंद झाली आहे.