एक-दोन नव्हे तर तब्बल 27 बायकांसोबत राहणारा पती, 150 मुलं आणि बायकांवर लादतो विचित्र अटी
एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर तब्बल 27 लग्नं केल्याचं नुकतंच समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर या व्यक्तीला तब्बल 150 मुलं आहेत. वेगवेगळ्या विवाहातून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला ही संतती प्राप्ती झालेली आहे. याबाबत या व्यक्तीच्या 38 वर्षीय मुलीने सांगितलं आहे. तिचं म्हणणं आहे की, एका कुटुंबात इतकी माणसं असणं आणि त्याचं एकाच घरात राहणं […]
ADVERTISEMENT

एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर तब्बल 27 लग्नं केल्याचं नुकतंच समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर या व्यक्तीला तब्बल 150 मुलं आहेत. वेगवेगळ्या विवाहातून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला ही संतती प्राप्ती झालेली आहे. याबाबत या व्यक्तीच्या 38 वर्षीय मुलीने सांगितलं आहे. तिचं म्हणणं आहे की, एका कुटुंबात इतकी माणसं असणं आणि त्याचं एकाच घरात राहणं ही एक अतिशय रंजक गोष्ट असल्याचं मुलगी म्हणते.
‘द सन’च्या रिपोर्टनुसार, कॅनडामध्ये राहणारे 65 वर्षीय विन्स्टन ब्लॅकमोर (Winston Blackmore) यांनी तब्बल 27 लग्न केली आहेत. तसेच विन्स्टन एकूण 150 मुले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीचे नाव मेरी जेन ब्लॅकमोर (Mary Jayne Blackmore) आहे. तिनेच विन्स्टनच्या खऱ्या आयुष्याबाबत सांगितलं आहे.
27 लग्नं आणि 150 मुलं
Mormon Community मध्ये वाढलेली, मेरी जेन म्हणते की तिच्याकडे लहानपणी भावंडांची संपूर्ण फौज होती. जेव्हा ती 14 वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांना 12 बायका होत्या आणि त्यावेळी मेरीला 40 भावंडे होती. मात्र, नंतर वडिलांनी आणखी अनेक लग्नं केली आणि भावंडांची संख्या दीडशेवर पोहोचली.