क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर महिलेनं पतीला नजरेसमोर करायला लावला बलात्कार
– सुरेन्द्र रामटेके, वर्धा एका 14 वर्षाच्या मुलीला घरात कोंडून महिलेनं पतीला तिच्यावर बलात्कार करायला लावल्याची संतापजनक घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात ही भयंकर घटना घडली असून, या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या पतीसह महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. […]
ADVERTISEMENT

– सुरेन्द्र रामटेके, वर्धा
एका 14 वर्षाच्या मुलीला घरात कोंडून महिलेनं पतीला तिच्यावर बलात्कार करायला लावल्याची संतापजनक घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात ही भयंकर घटना घडली असून, या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या पतीसह महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांना दिलेल्या तक्रारी नुसार पत्नीनेच पतीला अत्याचार करावयास लावल्याची घटना आर्वी तालुक्यात घडली. तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन पीडिता घरी एकटीच होती. पीडिता एकटीच असल्याचं दिसल्यानंतर आरोपी महिलेनं आपल्या घरी बोलावून घेतलं. पीडित मुलगी आरोपीच्या दाम्पत्याच्या घरी आली. त्यानंतर आरोपी महिलेनं ‘तू माझ्या पतीसोबत लग्न कर’, असं तिला म्हणत घराचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. त्यानंतर आरोपी महिला बाहेर निघून गेली.
धक्कादायक ! वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलेवर मावस जावयाकडून अत्याचार