धक्कादायक ! सासरच्या जाचाला कंटाळून नागपूरमधील डॉक्टरची आत्महत्या

मुंबई तक

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी नागपूरमधील एका डॉक्टरने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. अभिजीत धामणकर असं या मृत डॉक्टरचं नाव असून ते शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करत होते. शुक्रवारी नाईट शिफ्टला डॉ. अभिजीत ड्युटीवर असताना ते नाईट राऊंड झाल्यानंतर डॉक्टरांसाठीच्या रुममध्ये आराम करायला गेले. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

नागपूरमधील एका डॉक्टरने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. अभिजीत धामणकर असं या मृत डॉक्टरचं नाव असून ते शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करत होते. शुक्रवारी नाईट शिफ्टला डॉ. अभिजीत ड्युटीवर असताना ते नाईट राऊंड झाल्यानंतर डॉक्टरांसाठीच्या रुममध्ये आराम करायला गेले.

पहाटे रुग्णालयात एक इमर्जन्सी पेशंट आल्यानंतर नर्स डॉ. अभिजीत यांना उठवण्यासाठी गेली असता तिला ते जमिनीवर पडलेले आढळले.

यानंतर रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टर्सना बोलावून याबद्दल माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी अभिजीत यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली, परंतू विषारी इंजेक्शनचा हेवी डोस घेतल्यामुळे डॉ. अभिजीत यांनी अखेरचा श्वास घेतला होता. अभिजीत यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून पारिवारीक त्रास आणि सासरकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

नांदेड : पत्नीसह सासरच्या मंडळीकडून छळ आणि मारहाण; प्राध्यापकाने मृत्यूलाच कवटाळलं

पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर डॉ. अभिजीत यांनी दुसरं लग्न केलं होतं. परंतू सासरच्या मंडळींचा संसारातला वाढता हस्तक्षेप आणि ढवळाढवळ यामुळे अभिजीत आणि त्यांच्या पत्नीत दुरावा वाढत गेला. अभिजीत यांच्या १ वर्षाच्या मुलालाही त्यांना भेटू दिलं जात नव्हतं, ज्यामुळे ते तणावाखाली होते. याच तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं कळतंय. दरम्यान गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.

अरेरे! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईने परकरच्या नाडीने गळा आवळून संपवलं

हे वाचलं का?

    follow whatsapp