शिक्षण डबल एम.ए. , मराठी-इंग्रजीसह चार भाषांवर प्रभुत्व; तरीही मौजमजेसाठी तरुणी बनली पाकीटमार
आतापर्यंत आपण चोरांच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतली. काही जणांना परिस्थितीमुळे चोरी करावी लागते तर काहीजणं ही निव्वळ मजामस्ती आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगता यावं म्हणून चोरी करतात. नागपूरमध्ये असाच एक प्रकार पुढे आला आहे. ज्यात सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एका सधन घरातील उच्चशिक्षीत तरुणीला अटक केली आहे. या मुलीला अटक केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तीने पाकीटमारीतून […]
ADVERTISEMENT

आतापर्यंत आपण चोरांच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतली. काही जणांना परिस्थितीमुळे चोरी करावी लागते तर काहीजणं ही निव्वळ मजामस्ती आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगता यावं म्हणून चोरी करतात. नागपूरमध्ये असाच एक प्रकार पुढे आला आहे. ज्यात सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एका सधन घरातील उच्चशिक्षीत तरुणीला अटक केली आहे. या मुलीला अटक केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तीने पाकीटमारीतून चोरलेला मुद्देमालही पोलिसांना मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरमध्ये या महिलेने २० ठिकाणी चौऱ्या केल्याचं समोर आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असणारी ही तरुणी केवळ २७ वर्षांची आहे. या तरुणीच्या घरची आर्थिक स्थिती सधन आहे. इतकच नव्हे तर अभ्यासात हुशार असलेल्या या मुलीने डबल एम. ए. केलं असून तिचं मराठी, इंग्रजीसह आणखी तीन ते चार भाषांवर प्रभुत्व आहे. असं असूनही काही वर्षांपूर्वी तिला चोरीची सवय लागली आणि तिने नागपूर शहरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली.
कोल्हापूर: लग्न झालेली प्रेयसी प्रियकरासोबत पळून आली कोल्हापुरात, धर्मशाळेत गळफास घेऊन दोघांचीही आत्महत्या
संबंधित पाकिटमार तरुणीने गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून रोख रक्कम आणि दागिने लंपास करण्याचा सपाटाच लावला होता.