नाशिक : प्रेम प्रकरणातून तरुणाला जिवंत पेटवलं; मुलीसह आईवडील, भाऊ पोलिसांच्या ताब्यात
–प्रवीण ठाकरे, नाशिक प्रेम प्रकरणातून एका तरुणाला जीवघेणा हल्ला करून जिवंत पेटवल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीसह तिचे आईवडील आणि दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात एक जण अल्पवयीन आहे. देवळा तालुक्यातील लोहणेर येथे मुलीसह कुटुंबियांनी तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. या […]
ADVERTISEMENT

–प्रवीण ठाकरे, नाशिक
प्रेम प्रकरणातून एका तरुणाला जीवघेणा हल्ला करून जिवंत पेटवल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीसह तिचे आईवडील आणि दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात एक जण अल्पवयीन आहे.
देवळा तालुक्यातील लोहणेर येथे मुलीसह कुटुंबियांनी तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवक 55 टक्के भाजला असून, त्याच्यावर देवळा तालुका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बलात्कार पीडितेचं जगणं झालंय मुश्कील, ‘तो’ Video व्हायरल झाल्याने 5 वर्षापासून पीडिता घरातच
गोरख काशिनाथ बच्छाव असं जखमी युवकाचं नाव आहे. तो तरुणीचा नात्यातीलच असल्याची माहिती आहे. याप्रकरणात देवळा पोलिसांनी संबंधित मुलगी, तिचे आईवडील आणि दोन भाऊ यांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.
तरुणावर का करण्यात आला हल्ला?
गोरख बच्छाव या मुलाचे आणि आरोपी मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणाने दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर मुलीचं दुसरीकडे लग्न ठरलं होतं, मात्र ते मोडलं. याच रागातून पीडित तरुणावर हल्ला करण्यात आला.
नागपुरातील संतापजनक घटना! तरुणीवर चौघांकडून दोन दिवस सामूहिक बलात्कार
रावळगाव येथील रहिवासी असलेल्या आरोपी मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर गावातील गोरख बच्छाव याच्यासोबत सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघे नातेसंबंधातील आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं प्रेम प्रकरण संपुष्टात आलं. त्यांचं ब्रेकअप झालं हे मात्र कळू शकलं नाही.
ब्रेकअपनंतर मुलीचं दुसरीकडं लग्न ठरलं होतं. मात्र, काही कारणानं हे लग्न मोडलं. यामागे गोरखचाच हात असल्याचा संशय मुलीला व तिच्या कुटुंबियांना होता. याच संशयातून त्यांनी गोरखला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
‘मुलगाच हवा’ म्हणून गर्भवती महिलेच्या डोक्यात ठोकला खिळा, ओलांडल्या अंधश्रद्धेच्या मर्यादा
मुलीचे आई-वडील व दोन भाऊ यांनी मुलाच्या डोक्यात वार करुन मुलीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला. त्यानंतर त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुण 55 टक्के भाजल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.