दहीहंडीत जखमी झालेल्या उपचारादरम्यान गोविंदाचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला केली १० लाखांची मदत

मुंबई तक

दहीहंडी स्पर्धेत सातव्या थरावरून पडून मृत्यू झालेल्या 26 वर्षीय संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर झालीय. आमदार दिलीप लांडे स्वतः 10 लाखांचा धनादेश घेऊन दळवींच्या कुटुंबियांना देणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ही मदत जाहीर केली. याआधी सरकारने मदत देण्याचं जाहीर केलं होतं. सायंकाळी विधान भवन परिसरात आमदार लांडे यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दहीहंडी स्पर्धेत सातव्या थरावरून पडून मृत्यू झालेल्या 26 वर्षीय संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर झालीय. आमदार दिलीप लांडे स्वतः 10 लाखांचा धनादेश घेऊन दळवींच्या कुटुंबियांना देणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ही मदत जाहीर केली. याआधी सरकारने मदत देण्याचं जाहीर केलं होतं. सायंकाळी विधान भवन परिसरात आमदार लांडे यांनी 10 लाखांचा धनादेश दाखवत आपण संदेश दळवी याच्या कुटूंबियांना देणार असल्याचं सांगितलं.

सातव्या थरावरून पडलेल्या संदेशचा उपचारादरम्यान मृत्यू

विलेपार्ले पूर्व बाबरवाडा विमानतळ येथे दहीहंडी फोडत असताना संदेश सातव्या थरावरुन खाली कोसळला. त्याला कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. मुंबईतील नानावटी रुग्णालयात दोन दिवस तो दाखल होता. 7व्या थरावरुन खाली कोसळल्यामुळे त्याच्या मानेला आणि मेंदूला जबर दुखापत झाली होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. संदेश आपल्या आई-वडील आणि भावंडांसह कुर्ल्याला राहत होता. अवघ्या 26 वर्षात त्याचं निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

यंदा निर्बंधमुक्त उत्सव

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध होते. मात्र, यंदाच्यावर्षी मोठ्या उत्साहात आणि निर्बंधमुक्त सण साजरे करता येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यामुळे यंदा गोकुळाष्ठमीनिमित्त राज्यभर मोठ्या उत्साहात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक राजकीय मंडळींनी मोठ्या धुमधडाक्यात दहीहंडीचे आयोजन केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, संदेशच्या मृत्यूमुळे या आनंदावर विर्जन पडले आहे.

मुख्यमंत्र्यानी गोविंदांसाठी केली होती घोषणा

गोविंदा पथकांसाठी राज्य सरकारने विविध निर्णयाची घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा कवच ते या तरुणांना सरकारी नोकरीत आरक्षण, अशा विविध प्रकारच्या घोषणा गोविंदा पथकांसाठी केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या गोविंदा पथकांना सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण दिले जाईल, ही मोठी घोषणा केली होती. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मृत्यू झालेल्या गोविंदाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपये

एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. अशात सातव्या थरावरून पडलेल्या संदेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदेशाच्या कुटुंबियांना लवकरचं सहायता देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्याचदिवशी शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांनी संदेश दळवीच्या. कुटुंबियांच्या नावाने लिहलेलं धनादेश पत्रकरांना दाखवला. ते लवकरचं संदेशाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धनादेश सुपूर्द करणार असल्याचं त्यांनी मुंबई tak ला सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp