साताऱ्यात कार्यकर्ते 'काँग्रेस छोडो'च्या मूडमध्ये; 1200 जणांचा भाजपमध्ये प्रवेश

येत्या काळात पक्षप्रवेशाचे मोठे बॉम्बस्फोट होतील.
Congress BJP flags
Congress BJP flags Photo- India Today

सातारा : भारत जोडो यात्रा अद्याप महाराष्ट्रात असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यातील जवळपास 1200 कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुवळे यांच्या उपस्थितीतमध्ये हा पक्षप्रवेश झाला. काही दिवसांपूर्वीच भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनी याचे संकेत दिले होते.

साताऱ्यातील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यावर रवाना झाले. कोल्हापूरमध्ये त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी आगामी काळात विरोधकांना उमेदवारही मिळणार नाहीत, असा इशारा दिला. ते म्हणाले, राहुल गांधींची यात्रा नेत्यांनी त्यांच्या मुलांनी हायजॅक केली. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी नंदुरबार, मीरा भायदंरमध्येही अनेक प्रवेश झाले. यात्रा महाराष्ट्रात असताना हे प्रवेश होत आहेत.

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नेत्यांना फक्त सेटल करण्यासाठी बसवण्यात आले होते. त्यात सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार हायजॅक केले होते. याची अस्वस्थता काँग्रेसचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. येत्या काळात पक्षप्रवेशाचे मोठे बॉम्बस्फोट होतील. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत ही त्यांच्यात अस्वस्थता आहे, अशीही टीका बावनकुळे यांनी यावेळी केली.

नवीन सरकारचे तोंड भरुन कौतुक :

यावेळी बावनकुळे यांनी नवीन सरकारचे तोंड भरुन कौतुक केले. ते म्हणाले, नवीन सरकार आल्यावर फरक जाणवत असल्याचे लोक बोलतात. एका बाजूला मुख्यमंत्री मंत्रालयात जात नव्हते. तर दुसरीकडे आताचे मुख्यमंत्री 18 तास काम करत आहेत. महाराष्ट्र प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोडी काम करत आहे. जनतेला आपला वाटणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कार्यरत आहेत. फडणवीस आणि शिंदे यांनी आपले आयुष्य समाजासाठी घालवले आहे. अडीच वर्षाचा बॅकलॉग हे सरकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, असेही आश्वासन त्यांनी दिले.

उद्धव ठाकरेंवर टीका :

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी आपल्या भोंदूबाबा आणि जादूटोणा विधनावरुन स्पष्टीकरण देत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मी जादूटोणाचे वक्तव्य उपरोधिकपणाने केले होते. शरद पवार यांच्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे गेले. आलेली सत्ता विसरून, विचार बदलून ते शरद पवार यांच्या सोबत बसत असतील तर हे जादूटोणा सारखेच आहे. बुद्धिभ्रांश सारखा हा प्रकार आहे.

अजूनही उद्धव ठाकरे फसले आहेत. उद्या ते काँग्रेसच्या डायसवरही जाऊन बसतील. पवार साहेब आपल्याकडे घेतले की त्याचा कार्यक्रम करतात. उद्धव ठाकरे यांनी सगळ्या मोठी चूक केली आहे ते म्हणजे त्यांनी विचारांशी तडजोड केली. उद्धव ठाकरे आता काँग्रेसचे संविधान स्वीकाराचे बाकी राहिलेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे विचार स्वीकारल्याने शिवसैनिक शिंदे गटात जात आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in