Abdul Sattar : CM शिंदेंनी टोचले कान, सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश

अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्त्यव्यावर दीपक केसरकरांनी मागितली माफी
Abdul Sattar - Eknath shinde
Abdul Sattar - Eknath shindeMumbai Tak

मुंबई : महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात राज्यभरात निदर्शन करण्यात येत आहेत. मुंबईत त्यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीने आंदोलन केलं. यावेळी त्यांच्या बंगल्याचीही तोडफोड करण्यात आली. सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी होतं आहे.

दरम्यान सर्वच स्तरातून सत्तार यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना फोन करुन त्यांचे कान टोचले. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे चांगलेच संतप्त झाल्याचं पाहालया मिळालं. तसंच त्यांनी सत्तार यांना जाहीरपणे माफी मागण्याचेही आदेश दिले आहेत. यासोबतच सर्व प्रवक्त्यांनी संसदीय भाषेची मर्यादा पाळूनच विरोधकांवर टीका करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सत्तारांकडून फक्त दिलगिरी :

सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यात त्यांनी कुठेही सुप्रिया सुळेंचं नाव घेतलेलं नाही. जे आम्हाला बदनाम करतायत त्यांच्याबद्दल मी बोललो. मी कोणत्याही महिलेबद्दल बोललो नाही. मी महिलांचा सन्मान करतो. पण कुठल्या महिलेचं मन दुखलं असेल तर मी खेद व्यक्त करतो. मी माझे शब्द मागे घेतो. कुठल्या महिलेचं मन दुखलं असेल तर मी सॉरी बोलतो, असं त्यांनी म्हटलं आहे. 

अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले?

'सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत... काय सांगाल?', असा प्रश्न 'लोकशाही' वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, 'इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ', असं उत्तर सत्तारांनी दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in