‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी; विधानसभेला तर 200..’, संजय राऊतांचा दावा

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त आणि लोकसभेला 40 जागा निवडून येतील. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. (after kasba bypoll sanjay raut has claimed that he will win 200 seats in legislative assembly and 40 seats in the lok sabha)

राऊत म्हणाले की, ‘कसबा काय आणि चिंचवड काय दोन्ही निवडणुकांनी भाजप आणि बंडखोरांना धडा शिकवला आहे. चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे, हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो. हा विजय जगताप पॅटर्नचा आहे. जर राहुल कलाटेंनी माघार घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता.’ असं राऊत यावेळी म्हणाले.

‘दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचं दर्शन, प्रदर्शन, विकृती पाहायला मिळाली. पण मतदारांनी सत्ताधाऱ्यांना चपराक लगावली. पुणेकर अभिनंदनास पात्र आहेत. ते कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. जनतेने धनशक्ती लाथाडली. कसबा ही सुरुवात आहे. यावेळी कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, असं म्हणत राऊत यांनी शिंदे गटालाही डिवचलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राऊतांची निवडणूक आयोगाला शिवीगाळ

शिवसेना (Shivsena) पक्ष आणि ‘धनुष्य बाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताब्यात गेल्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने निवडणूक आयोग आणि शिंदे यांना लक्ष्य केलं जातं आहे. अशातच आज (शुक्रवारी) सांगलीत बोलताना ठाकरे गटाचे (Thackeray Faction) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगाबद्दल शिवराळ भाषा वापरली.

संजय राऊतांनी भाजपला डिवचलं, म्हणाले, ‘कसब्यात शिवसेनेमुळे BJP जिंकायचं, आता..’

ADVERTISEMENT

काय म्हणालेले संजय राऊत?

मी जे बोलत आहे ते जाणीवपूर्वक बोलत आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या घशात आणि खिशात शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण ही निशाणी घातली आहे, तसे करायला शिवसेना तुमच्या बापाची आहे का रे भो*%#? असा सवाल करत राऊतांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सांगलीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

ADVERTISEMENT

राणे vs राऊत संघर्ष : शरद पवारांनी नारायण राणेंना फटकारलं, काय बोलले?

मी जे बोलत आहे ते जाणीवपूर्वक बोलत आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या घशात आणि खिशात शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण ही निशाणी घातली आहे, तसे करायला शिवसेना तुमच्या बापाची आहे का रे भो*%#? असा सवाल करत राऊतांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सांगलीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.c

Shivsena तुमच्या बापाची आहे का भो*%#? संजय राऊतांचा तोल ढळला!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT