Maharashtra Cabinet : २० जुलैला मंत्रिमंडळ विस्तार?, १२ जण घेणार मंत्रीपदाची शपथ?
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ३० जूनला झालेल्या या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लाटा मोजत बसलेत का? मंत्रिमंडळ विस्तार का […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ३० जूनला झालेल्या या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लाटा मोजत बसलेत का? मंत्रिमंडळ विस्तार का नाही?-शिवसेना
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार?
‘मुंबई Tak’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता २० जुलैला म्हणजेच राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १० ते १२ मंत्र्याना शपथ दिली जाईल. त्यानंतर २५ जुलैपासून अधिवेशन सुरू होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार होतं. मात्र १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन २५ जुलैपासून सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.