अहमदनगर-आष्टी रेल्वे प्रवाशांविना ओस : गाडीत रोज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी
रोहित वाळके, अहमदनगर : कोट्यावधी रूपये खर्च करून सुरू केलेली अहमदनगर-आष्टी रेल्वे अवघ्या आठवड्याभरातच प्रवाशांविना ओस पडल्याचे चित्र आहे. 700 वाहन क्षमता असलेल्या गाडीत रोज केवळ 60 ते 70 प्रवासीच प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ राजकीय दबावापोटी ही तोट्यातील रेल्वे सुरू केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 400 रुपये कमाईवर […]
ADVERTISEMENT

रोहित वाळके, अहमदनगर :
कोट्यावधी रूपये खर्च करून सुरू केलेली अहमदनगर-आष्टी रेल्वे अवघ्या आठवड्याभरातच प्रवाशांविना ओस पडल्याचे चित्र आहे. 700 वाहन क्षमता असलेल्या गाडीत रोज केवळ 60 ते 70 प्रवासीच प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ राजकीय दबावापोटी ही तोट्यातील रेल्वे सुरू केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
400 रुपये कमाईवर 4 लाख खर्च :
जागरूक विचार मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून अहमदनगर-पुणे अशी शटल सुरू करण्याची आमची मागणी आहे. पण केवळ राजकीय दबावापोटी अहमदनगर-आष्टी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. अहमदनगर-आष्टीला प्राधान्य दिल्याने आम्ही माहिती घेतली असता रोज या गाडीने पाच ते दहा लोकचं नगर ते आष्टी आणि आष्टी ते नगर असा प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे 40 रूपये तिकीट आहे तर रेल्वेला 400 रूपये मिळतात. पण रेल्वेचे सेवेवर चार लाख रूपये खर्च होतात, त्यामुळे ही न पटणारी गोष्ट आहे.
गाडी पुण्यापर्यंत विस्तारण्याची मागणी :
अहमदनगरच्या हजारो लोकांची मागणी आहे की अहमदनगर-पुणे शटल सुरू झाली पाहिजे. अहमदनगर स्टेशनवर टर्मिनल नसल्याने नवीन गाडी सुरू करायला अडचण आहे. आता नवीन गाडी सुरू झाल्याने सर्व व्यवस्था आहे. अहमदनगर-आष्टी गाडी मोकळी पळविण्यापेक्षा ती गाडी आष्टी – अहमदनगर – पुणे अशी चालली तर अहमदनगरवरून पुण्याला जाणाऱ्या हजारो लोकांची सोय होऊ शकेल. शिवाय ट्राफिक जाम आणि इंधनावर खर्च होणाऱ्या हजारो रूपयांच्या इंधनाचा चुराडाही वाचेल. त्यामुळे आमची मागणी रास्त आहे, असेही मुळे म्हणाले.