“अजित पवार ज्यांच्या उरावर…”, उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या वर्मावर ‘बाण’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

ajit pawar joined shinde government, uddhav thackeray targets eknath shinde and 40 mlas.
ajit pawar joined shinde government, uddhav thackeray targets eknath shinde and 40 mlas.
social share
google news

Uddhav Thackeray On Eknath Shinde, Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारला सुनावलं. याच वेळी अजित पवार यांच्या नाराजींचा मुद्दा आला अन् ठाकरेंनी शिंदे आणि ४० आमदारांच्या वर्मावर बाण मारला.

“मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सक्रिय दिसत नाहीये. त्यांची नाराजी असल्याचे समजतंय. तुमच्यासोबत ते उपमुख्यमंत्री होते. तुमचा अनुभव कसा आहे? अजित पवार जेव्हा नाराज होतात, तेव्हा काही सकारात्मक गोष्टी त्यांच्या दृष्टीने घडून येतात”, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला.

उद्धव ठाकरेंनी काय दिले उत्तर?

अजित पवारांच्या नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्यावेळी तरी त्यांची अशी काही नाराजी मी बघितली नव्हती. माझ्याबरोबर सगळे व्यवस्थित होते. उलट ते चांगलं काम करत होते म्हणून ज्या लोकांच्या पोटात दुखत होतं. त्यांच्या उरावर आता अजित पवार बसले आहेत.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Narendra Modi Net Worth : मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केलीये गुंतवणूक?

यालाच जोडून पुढे ठाकरे म्हणाले, “त्याच्यामुळे अजित पवारांपेक्षा ज्यांच्यावर उरावर ते बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजे. ज्यांनी त्यांना बसवलंय. त्यांच्याही ते उरावर बसलेत म्हणून त्यांनीही नाराज व्हायला पाहिजे”, असा टोला ठाकरेंनी लगावला.

नांदेड रुग्णालयाच्या ‘डीन’वर गुन्हा, ठाकरेंनी केला सवाल

शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे डीन वाकोडे यांच्यासह दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबद्दल उद्धव ठाकरेंनी सवाल केला. ते म्हणाले, “रुग्णालयात बळी जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत बसलेत. मुख्यमंत्र्यांचं आणि दुसऱ्या हाफ उपमुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं की, कारण शोधायला पाहिजे होतं. नांदेडच्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला. पण, फक्त एकाच डीनवर गुन्हा दाखल का झाला? कळवा, नागपूर, संभाजीनगरमध्येही बळी गेलेत.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘तुम्हाला पळ काढता येणार नाही’, मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला झापलं

पुढे ते म्हणाले, “ज्या डीनला एका मस्तवाल खासदाराने संडास साफ करायला लावला. आदिवासी आहेत, असं ते म्हणतात. मी कधीच जातपात बघत नाही. त्या गद्दारावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला म्हणून धमकावण्यासाठी त्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय का?”, असा नवा मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT