निकाल लागू द्या, मग सांगतो पुण्यात काय घडलंय?, अजित पवारांनी दिला इशारा

मुंबई तक

Ajit Pawar Speech : राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला. विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावरून अजित पवारांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं. त्याचबरोबर कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. (ajit Pawar attacks bjp over chinchwad and kasba peth bypolls) अजित पवार म्हणाले, “पुण्याचा निकाल लागला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ajit Pawar Speech : राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला. विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावरून अजित पवारांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं. त्याचबरोबर कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. (ajit Pawar attacks bjp over chinchwad and kasba peth bypolls)

अजित पवार म्हणाले, “पुण्याचा निकाल लागला ना, तर आहे ते पण जाईल. पुण्याचा निकाल काय लागेल, हे मला सांगता येत नाही, पण गिरीश महाजनांसहित सगळ्यांना तीन-तीन चार-चार दिवस बसावं लागलं ना? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किती दिवस बसावं लागलं. तिथे काय घडलं, याबद्दल आज बोलणार नाही. एकदा निकाल लागू द्या, पुण्यामध्ये, चिंचवडमध्ये काय घडलं? कोण सापडलं, कोण काय करत होतं, कोण सांगत होत की मतदानाला जाऊ नका, मतदानाला जा सांगताना काय सांगत होतं, ते आता सांगत नाही.”

अजित पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात ती निवडणूक त्यांना (भाजप-शिवसेना युती) हाताळता आलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने खूप चांगल्या पद्धतीने विरोध करण्याचं काम केलेलं आहे. ती भावनेची निवडणूक होती, पण ती आम्ही होऊ दिली नाही. कसब्यातील निकाल सातत्यानं कसा येत होता, त्यामुळे ठाण मांडून कसे बसले होते. काहींना मोक्कातून सोडल्यानंतर काही लोक कसे फिरत होते. आणखी कोण काय करत होतं? त्या खोलात आता मी जात नाही”, असा इशारा अजित पवारांनी भाजपला दिला.

Maharashtra Budget Live: अजित पवारांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

हे वाचलं का?

    follow whatsapp