काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम?
बातम्या राजकीय आखाडा

काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम?

Maharashtra political news in marathi : Deputy Chief Minister Devendra Fadnavis met Ashish Deshmukh in Nagpur. Discussions have started that he can be nominated from Savner constituency.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अजूनही विरलेली नाही. अशातच नागपुरातले काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांची भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. देशमुखांच्या निवासस्थानी सुमारे तासभर ही भेट झाली. यानंतर आशिष देशमुखांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. देशमुखांच्या माध्यमातून भाजपला काय साधायाचंय? देशमुखांच्या माध्यमातून भाजपला कोणाला रोखायचंय हेच जाणून घेऊयात.

देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौरा केला. तिथून आल्यानंतर त्यांनी आशिष देशमुखांची भेट घेतली. ‘सावनेरमध्ये तुमच्यातलाच एक लढणार’ असं विधान फडणवीसांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीसांचं हे विधान सुचक असल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतरच देशमुख आणि फडणवीस ही भेट झाल्याने आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर सावनेरमधून निवडणूक लढवतील असा अर्थ काढण्यात येतोय.

आशिष देशमुख यांनी या भेटीबद्दल बोलताना सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस हे नाश्त्यासाठी माझ्याकडे आले होते. 2019 ला मी त्यांच्याविरोधात लढलो होतो. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. काल जे विरोधक होते, ते आज मित्र असतात. याचसाठी फडणवीसांसोबत भेट झाली.”

हेही वाचा >> Aryan khan case : महागडी घड्याळं, परदेशी वाऱ्या; समीर वानखेडेंविरोधात काय सापडलं?

भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर देशमुख म्हणाले, “असं काही नाही. मी काँग्रेसमध्येच आहे. मला दिलेल्या नोटीसचं सविस्तर उत्तर मी दिलं आहे. मला खात्री आहे की, काँग्रेस मला काढणार नाही. पण, पक्षविरहित राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे देवेंद्रजींशी कौटुंबिक संबंध आहे म्हणून ते आले होते.”

आशिष देशमुखांनी या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं सांगितलं असलं, तरी ही भेट शुद्ध राजकारणापोटीच असून, नागपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन माजी मंत्र्यांना शह देण्यासाठी भाजप ही राजकीय खेळी खेळत असल्याचं म्हटलं जातंय.

भाजप आशिष देशमुख यांना पक्षात घेण्यासाठी आग्रही का आणि सावनेरमधूनच का देशमुखांना लढवलं जाईल हे माहिती करुन घेऊयात.

नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर मतदारसंघातून 1995 पूर्वी आशिष देशमुखांचे वडील रणजित देशमुख निवडणूक लढवत होते. तेव्हापासून काँग्रेसचा एक मोठा गट रणजित देशमुख आणि देशमुख कुटुंबाला मानणारा आहे. आशिष देशमुख यांना सावनेरमधून भाजपची उमेदवारी दिली, तर सुनील केदार यांच्यासमोर दमदार उमेदवार भाजपला देता येईल.

हेही वाचा >> संजय पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, ‘ती’ जाहिरातबाजी भोवली

आताच्या घडीला सुनील केदार यांचं नागपुरात चांगलं वजन आहे आणि नागपुरात त्यांची चांगली ताकदही आहे. सुनील केदार यांचा काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला नागपुरात आणि विदर्भात फायदा होईल, हे स्पष्ट आहे. 5 टर्म सावनेरमधून आमदार राहिलेल्या आणि मतदारसंघावर चांगला होल्ड असलेल्या केदार यांना आव्हान देण्यासाठी भाजपकडे तितका तगडा उमेदवार नाही.

विदर्भातली काँग्रेसची ताकद लक्षात घेऊन काँग्रेसमधूनच नेता फोडून सावनेर विधानसभा मतदारसंघात यश मिळवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत.

आशिष देशमुख भाजपमध्ये जातील असं का बोललं जातंय?

2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आशिष देशमुख सावनेरमधून भाजपचे उमेदवार राहिले होते आणि अवघ्या 3 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

त्यानंतरच्या 2014च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोलमधून लढले होते आणि तेथे त्यांचे काका माजी मंत्री अनिल देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये थांबले नाही. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्येही त्यांचे फार काळ जमले नाही आणि त्यांनी थेट श्रेष्ठींसोबत पंगे घेणे सुरू केले.

काही दिवसांपूर्वीच आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती. आशिष देशमुख यांनी नोटिशीला उत्तर दिल्यानंतर प्रक्रिया थंड बस्त्यात गेली.

हेही वाचा >> 2000 notes ban : … तर ही वेळ आली नसती, राज ठाकरे मोदी सरकारवर संतापले

काँग्रेसला नागपुरात रोखण्यासाठी आणि भाजपचं वजन वाढवण्यासाठी भाजप देशमुखांच्या माध्यमातून आपली पकड नागपुरमध्ये घट्ट करण्यासाठी हालचाली करेल आणि त्यासाठी आशिष देशमुखांना भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या हालचाली सुरू आहेत.

फडवीसांच्या भेटीनंतर आशिष देशमुखांनी काही बोलणं टाळलं असलं तरी आशिष देशमुख भाजपमध्ये जाण्याचा मुहूर्त केव्हाचा असणार याबाबत सध्या नागपुरात चर्चा सुरू आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरची बायको अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा ‘या’ तरुणीला पाहून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल ही तर… चाळीशी ओलांडून देखील अभिनेत्री ‘सिंगल’,कोण आहेत ‘या’ Actress? ‘या’ अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर? Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक