Congress : बड्या नेत्याचा दिल्लीत लेटर बॉम्ब; नाना पटोलेंची खुर्ची धोक्यात?
Ashish Deshmukh met Congress President Mallikarjun Kharge दिल्ली : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत, त्यातही प्रामुख्याने काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. अधिकृत उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्यामुळे नाशिक मतदारसंघाची जागा घालवावी लागली. तर अमरावतीमध्ये ऐनवेळी शिवसेना (UBT) पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. नागपूरची जागाही अखेरच्या काही तासात वाट्याला आली. (Ashish Deshmukh met Congress […]
ADVERTISEMENT

Ashish Deshmukh met Congress President Mallikarjun Kharge
दिल्ली : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत, त्यातही प्रामुख्याने काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. अधिकृत उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्यामुळे नाशिक मतदारसंघाची जागा घालवावी लागली. तर अमरावतीमध्ये ऐनवेळी शिवसेना (UBT) पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. नागपूरची जागाही अखेरच्या काही तासात वाट्याला आली. (Ashish Deshmukh met Congress President Mallikarjun Kharge in New Delhi regarding Nana Patol.)
दरम्यान, काही दिवसांपासून काँग्रेसमधील सातत्याने दिसून येत असलेल्या या असमन्वयासाठी माजी आमदार आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरलं आहे. तसंच त्यांनी मंगळवारी (१७ जानेवारी) नवी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी देशमुख यांनी त्यांना महाराष्ट्रातील काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक असल्याचं सांगत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणीही केली. याबाबत त्यांनी खर्गे यांना एक पत्रही दिलं.
काय म्हटलं आहे आशिष देशमुख यांच्या पत्रात?