भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी का फिस्कटली?; आशिष शेलारांचा मोठा गौप्यस्फोट
भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१७ मध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या आघाडीचा प्रस्ताव होता. तशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्याबरोबर झाली होती, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. आता शेलारांच्या या विधानावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया उमटतात हे बघावं लागणार आहे. लोकसत्ताने आयोजित केलेल्या ‘दृष्टी […]
ADVERTISEMENT

भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१७ मध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या आघाडीचा प्रस्ताव होता. तशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्याबरोबर झाली होती, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. आता शेलारांच्या या विधानावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया उमटतात हे बघावं लागणार आहे.
लोकसत्ताने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात आमदार आशिष शेलार यांनी हे विधान केलं आहे. शेलार यांनी शिवसेना-भाजप युतीचा काळ, शिवसेनेबरोबरचा दुरावा, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरची परिस्थिती, भाजपची आगामी वाटचाल, मनसेबरोबरील युती आणि भोंग्यांच्या वादासह इतर मुद्द्यांवर भाष्य केलं.
पंतप्रधानांनी इतर विषयांच्याच तारा जास्त छेडल्या; संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र
“भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७ मध्येच सारी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची सारी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने विरोध केल्याने तीन पक्षाचं सरकार तेव्हा स्थापन झालं नाही. दुसरीकडे २०१९ मध्ये त्याच शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं सलगी केली,” असं आशिष शेलार या कार्यक्रमात म्हणाले.