'औरंगजेब क्रूर, हिंदू द्वेष्टा नव्हता', आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Jitendra Awhad Controversy: छत्रपती संभाजीराजेंबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची पाठराखण करताना आमदार जितेंद्र आव्हाडांनी मात्र वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य
जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Jitendra Awhad Controversial Statement on SambhajiRaje: मुंबई: विधानसभेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत (Chhatrapati Sambhajiraje) राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकारण होताना दिसतं आहे. 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते.' असं अजित पवार म्हणाले होते. यावर भाजपच्या (BJP) नेत्यांकडून टीका करण्यात आली. भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली. पण अजित पवारांच्या वक्तव्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समर्थन केलं आहे. (aurangzeb was not cruel hindu hater jitendra awhad controversial statement)

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पवारांच्या वक्तव्याचं समर्थन करत भाजपवर टीका केली तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील अजित पवारांच्या वक्तव्याच समर्थन केलं. परंतु हे समर्थन करताना औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता असं वक्तव्य आव्हाडांनी केलं, त्यामुळे आता आव्हाडांना घेरण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे.

जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य
अजित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान? भाजप नेत्यांनं केली मोठी मागणी

पाहा जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले:

'छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी इथेच तर खरा इतिहास आहे. त्यांना बहादूरगडावर पहिल्यांदा नेण्यात आलं त्यांचे डोळे काढण्यात आलं. बाजूला विष्णूचं मंदिर होतं. औरंगजेब जर एवढा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा.. म्हणजे जे काही म्हणायचंय ते.. तर त्याने विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना.. तिथून त्यांना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतरचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे.' असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ट्विट करत आव्हाडांवर निशाणा साधला आहे. उपाध्याय त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, 'आज हे नक्की झालं की ncpspeaks हा राष्ट्रवादी नाही औरंगजेबाची आजची पार्टी आहे.'

जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य
'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला', प्रसाद लाडांच्या विधानाने वादाला खतपाणी!

भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी देखील आव्हाडांवर सडकून टीका केली आहे. 'सत्ता गेली की आता खायचे दात ही दिसायला लागलेत. औरंग्याचं कौतुक करताना धर्मवीर संभाजी महाराजांना झालेल्या अतीव यातनांची जाण आव्हाडांसारख्यांना नसणारच, कारण आव्हाडांना शिवप्रेमींपेक्षा मुंब्रावासीच अधिक महत्त्वाचे आहे.'

याशिवाय शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाडांनी औरंगाजेबाचे मंदिर बांधावे असं म्हणत जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, सगळीकडून टीका सुरु झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी सारवासारव केली आहे. पाहा जितेंद्र आव्हाडांनी यावर नेमकं काय स्पष्टीकरण दिलं.

'औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासाच्या प्रत्येक पानात आहे. त्याने स्वत:च्या भावाला मारलं, बापाला मारलं, स्वत:च्या मेव्हण्यांना मारलं. स्वत:च्या राज्य रचनेसाठी तो कोणालाच सोडत नसे. पण तरीही त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनंतर देखील इथली राज्यव्यवस्था त्याला शरण गेली नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.' असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी याबाबत काहीशी सावरासावर करण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता यावर पुढे काय राजकारण होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in