Sanjay Raut : हिंदुत्वाचा बाप कोण असेल तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे!

जाणून शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनी नेमकं काय म्हणाले आहेत संजय राऊत?
Sanjay Raut : हिंदुत्वाचा बाप कोण असेल तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे!
Balasaheb Thackeray is the Father of Hindutva says Sanjay Raut

आज फादर्स डे आहे. जगाने मान्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्यासाठी त्याच ठिकाणी आहेत. हिंदुत्वाचा बाप कोण असेल तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यासाठी आपल्याला या फादर्स डेचं महत्त्व आहे. शिवसेना हिंदुत्वाचा बाप का आहे ते आदित्य ठाकरे अयोध्येला गेल्यानंतर सगळ्या देशानं पाहिलं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत हे शिवसेनेच्या ५६ व्या वर्धपान दिनी बोलत होते.

तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो कायम है... असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. अग्निवीरांची भरती हे सरकार करणार आहे. मात्र अग्नीवीर तर समोर बसलेत. अग्निवीर म्हणजे चार वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्यभरती करणार आहेत. असा मूर्खपणाचा निर्णय वेडा मोहम्मद, तुघलक यांनीही घेतला नव्हता. मोदी सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शांत आहे कारण सूत्रं उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत.

Balasaheb Thackeray is the Father of Hindutva says Sanjay Raut
Sanjay Raut: देशाचं राजकारण प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर उभं आहे, हे श्रेय शिवसेनेचं

काही दिवसांपूर्वी मी एक वक्तव्य केलं होतं की श्रीलंकेत जी परिस्थिती निर्माण झाली ती इथेही निर्माण होऊ शकते. त्यावेळी माझ्यावर बरीच टीका झाली. पण आता एक महिन्याने काय चित्र आहे बघा. अग्निवीरवरून जे आंदोलन पेटलंय ते आवरण्यासाठी बिहारमध्ये लष्कर बोलवावं लागलं आहे.

मिस्टर फडणवीस तुम्हाला सांगू इच्छितो की नुसती कट कारस्थानं करून राजकारण होत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. आज जे टिरटिर करत आहेत राणा, फाणा लोक ते एक वेळ अशी येईल की शिवसेनेच्या पायाशी येतील. अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तुडवले जाल असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

देशाचं राजकारण हे प्रादेशिक पक्षाच्या करंगळीवर उभं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी लेखणी, कुंचला आणि वाणीच्या सहाय्याने शिवसेना उभी केली. त्यावेळी त्यांच्यावर प्रांतीयवादी असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना उदयास आली. त्या शिवसेनेला ५६ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेना स्थापन झाल्यावर देशभरातल्या विविध राज्यात प्रादेशिक पक्ष स्थापन झाले. हे पक्ष भूमिपुत्रांचे प्रश्न मांडत राहिले असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in