"नाना पटोलेंचा रोमान्स इन चेरापुंजी" चित्रा वाघ म्हणाल्या एकदम ओके कार्यक्रम

भाजप आमदार चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे त्यामध्ये त्यांच्यासोबत एक महिला दिसते आहे
BJP Leader Chitra Wagh Tweets Nana Patole Video in cherapunji hotel and Criticized him
BJP Leader Chitra Wagh Tweets Nana Patole Video in cherapunji hotel and Criticized him

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबत दिसत आहेत. चेरापुंजीमधल्या हॉटेलमधला हा व्हीडिओ समोर आलाय. याचं महत्त्वाचं कारण ठरल्या आहेत चित्रा वाघ. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे.

काय म्हटलं आहे चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंबाबत? काय आहे व्हीडिओत?

काय नाना तुम्ही पण झाडी..डोंगर आणि हाटिलात... हे वाक्य चित्रा वाघ यांनी पोस्ट केलंय. या व्हीडिओत नाना पटोले हे एका महिलेसोबत दिसत आहेत. नाना पटोले यांचा चेरापुंजीच्या हॉटेलमध्ये रोमान्स सुरू आहे. हेच ते पोलो ऑर्चिड हॉटेल जिथे नानांचा ओके कार्यक्रम चालू होता. असंही चित्रा वाघ यांनी या व्हीडिओत म्हटलं आहे.

नाना पटोले यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मेघालय मधल्या चेरापुंजी या ठिकाणी एका महिलेच्या गळ्यात हात टाकून नाना पटोले बसले आहेत हे दिसतं आहे. नाना पटोलेंवर यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसते आहे. याबाबत नाना पटोले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला स्पष्टीकरणही दिलं आहे. भाजपचे हे कटकारस्थान आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच या विरोधात मी न्यायलयात जाणार आहे, सगळ्या कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासते आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले सध्या पूरग्रस्त भागांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. अशातच त्यांचा महाराष्ट्राच्या बाहेरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काम करणाऱ्याला बदनाम करणे, ही भाजपची रणनीती आहे मी याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. चित्रा वाघ यांच्याविषयी मी काहीही बोलणार नाही, असंही नाना पटोले यांनी सांगितलं. दरम्यान, नाना पटोलेंना याची उत्तरे द्यावी लागतील, असे पत्रकार परिषदेच चित्रा वाघ यांनी मागणी केली आहे.

कुणाच्या खासगी आयुष्यात डोकावणं चुकीचंच आहे. पण ती गोष्ट जेव्हा लोकांमध्ये येते, सार्वजनिक होते त्यावेळी ती खासगी राहत नाही. आज सकारळपासून तो व्हिडीओ व्हायरल झाला नंतर माझ्याकडे आला. म्हणून मी नानांना विचारलं की नाना तुम्हीपण? असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. राजकारणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. नाना पटोले यांना या व्हीडिओबाबत विचारलं मात्र त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं नाही असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in