मुलाच्या मृत्यूबद्दल विचारताच एकनाथ खडसेंचा महाजनांना फर्दापूरच्या गेस्ट हाऊसबद्दल प्रश्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यामधील टिकेनं आता वैयक्तिक रुप धारणं केलं आहे. या दोघांनी मागील दोन दिवसात टिका करताना आता एकमेकांच्या मुलांसह कुटुंबियांनाही वादात ओढलं आहे. त्यामुळे जळगावचं राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर गेलं आहे.

नेमकं काय झालयं? महाजनांनी काय टीका केली?

नुकतचं नंदूरबार येथे एका कार्यक्रमात बोलताना गिरीश महाज यांनी खडसेंना सगळं घरातचं पाहिजे. पत्नी मंदा खडसे दूध संघात चेअरमन, रोहिणी खडसे जिल्हा बँकेत चेअरमन ही घराणेशाही संपली पाहिजे असं म्हणतं खडसेंवर निशाणा साधला.

महाजनांच्या टीकेला खडसेंचे प्रत्युत्तर :

महाजन यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना खडसे म्हणाले, दुसऱ्याकडे चार बोटं दाखविताना स्वतःकडेही एक बोटं असतं लक्षात ठेवाव. गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन या गेल्या कित्येक वर्षांपासून आधी सरपंच आणि नंतर जामनेरच्या नगराध्यक्ष आहेत. दुर्दैवाने बर झालं गिरीश महाजांना मुलगा नाही, अन्यथा पत्नीसह मुलगा-सून सगळेच राजकारणात आले असते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खडसेंच्या प्रत्युत्तरावर महाजनांचा पलटवार :

एकनाथ खडसेंची ही टीका महाजन यांच्या चांगलीचं जिव्हारी लागली. खडसेंना पुन्हा एकदा लक्ष्य करत ते म्हणाले, खडसे आजकाल काय बोलताय त्याचं त्यांना भान राहत नाही. ते बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेताता. तर कधी मला चावट म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे.

खडसेंच्या अनेक ठिकाणच्या भानगडी, चौकशा यात सबळ पुरावे मिळताहेत, म्हणून ते अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असताना ते काहीही बोलत आहेत. परवा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही त्यांनी सुदैवाने गिरीश महाजनांना मुलगा नाही, असं वक्तव्य केले, मला दोन मुली असून, मी त्यांना राजकारणात आणलेल नाही, मला त्याचा आनंद आहे, असं प्रत्युत्तर महाजन यांनी दिलं.

ADVERTISEMENT

महाजन पुढे म्हणाले, पण माझा खडसेंना प्रश्न आहे की त्यांनाही मुलगा होता, त्याचं काय झालं याचं उत्तर त्यांनी द्यावं, त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे, असं म्हणतं त्यांनीही खडसेंवर टीका केली.

ADVERTISEMENT

खडसेंचं महाजनांना आव्हान :

महाजन यांनी मुलाच्या मृत्यूवर प्रश्न विचारताच खडसे यांनी कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा म्हणतं महाजन यांना आव्हान दिलं. खडसे म्हणाले, माझ्या मुलाच्या मृत्यूबद्दल दहा वर्षांनी शंका उपस्थित करणं चुकीचं आहे, गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना आणि दुःख झालं आहे.

महाजन यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे कुत्सित मनोवृत्तीच लक्षण आहे, राजकीय द्वेषापोटी माणूस किती खाली जाऊ शकतो. हा सत्तेचा माज आणि मस्ती आहे, जनता ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. गिरीश महाजन यांचे अनेक कृत्य मी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत, पण मी कधी याबाबत बोललो नाही. अगदी फर्दापूरच्या गेस्टहाऊस काय झालं हेही माहित आहे, असं खडसे म्हणाले.

जळगावमधील दूध संघाच्या निवडणुकीने वाढवलं राजकीय तापमान :

जिल्ह्यातील नेत्यांनी प्रतिष्ठीत केलेल्या दूध संघाच्या निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसा भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतं आहे. आधी भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष गाजला होता. त्यानंतर आता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या मागील ७ वर्षे दूध संघात चेअरमन होत्या. युती सरकार सत्तेत येताच दूध संघावर मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रशासक नेमण्यात आला. त्यानंतर आता इथे निवडणूक जाहीर झाली आहे. दूध संघाच्या या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दूध संघ खडसेंच्या ताब्यात जाऊ नये यासाठी भाजपने कंबर कसली आहे, तर दूध संघ ताब्यात ठेवण्यासाठी खडसेही मैदानात उतरले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT