'सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक, तर अजित पवार...', गोपीचंद पडळकरांचं सुटलं भान - Mumbai Tak - bjp mla gopichand padalakar criticize supriya sule ajit pawar dhangar reservation - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

‘सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक, तर अजित पवार…’, गोपीचंद पडळकरांचं सुटलं भान

भाजप आमदार गोपिचंद पडळकरांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना गोपिचंद पडळकरांनी सुप्रिया सुळे यांनी लबाड लांडग्याची लेक म्हटलंय, तर अजित पवार यांना लबाड लांडग्याचे पिल्लू म्हटलं आहे.
bjp mla gopichand padalakar criticize supriya sule ajit pawar dhangar reservation

भाजप आमदार गोपिचंद पडळकरांची (Gopichand Padalkar) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्यावर प्रतिक्रिया देताना गोपिचंद पडळकरांनी सुप्रिया सुळे यांनी लबाड लांडग्याची लेक म्हटलंय, तर अजित पवार यांना लबाड लांडग्याचे पिल्लू म्हटलं आहे. त्याच्या या विधानावरून आता मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. पडकरांच्या या विधानावरून महायुतीतील अजित पवार गट देखील आक्रमक झाला आहे. (bjp mla gopichand padalakar criticize supriya sule ajit pawar dhangar reservation)

भाजप आमदार गोपिचंद पडळकर टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी गोपिचंद पडळकरांचं भान सुटला होता.सुप्रिया सुळेंनी धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली होती. या भेटीत सुप्रिया सुळे यांनी धनगर समाजाला भाजपने फसवल्याचा आरोप केला होता. या आरोपावर प्रतिक्रिया देताना गोपिचंद पडळकरांची जीभ घसरली होती. ही लबाड लांडग्यांची लेक बोलतेय, तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या, लोकांच्या चपला फाटल्या, तुमच्या भावाने, पुतण्याने कुणीच तिकडे पाहिले नाही. त्यामुळे तुम्ही जास्त पोळका आणायची गरज नाही अशी टीका गोपिचंद पडळकरांनी यावेळी केली.

हे ही वाचा : Shiv Sena MLAs Case : ‘आम्हाला सुनावणीचं वेळापत्रक सांगा’, सुप्रीम कोर्टाने फटकारलं

सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार यांच्या धनगर समाजाविषयीच्या भावना आम्हाला माहिती आहेत. यांच्या पोटात एक आणि ओठात एक असते, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही, अशी टीका गोपिचंद पडळकरांनी केली. तसेच हे काय बोलतात याला आम्ही काडीची किंमत देत नाही, असे देखील पडळकर स्पष्टच म्हणाले.

अजित पवार लबाड लांडग्याचा पिल्लू

धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. मात्र त्यांनी अजित पवारांना पत्र पाठवले नव्हते. यावर गोपिचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या बाबतीत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. तो लबाड लाडग्याचा लबाड पिल्लू आहे, त्याला आम्ही मानत नाही. त्यामुळे मी पत्र दिले नाही आणि पत्र देणेही आवश्यक वाटत नाही, अशी भूमिका गोपिचंद पडळकर यांनी अजित पवारांच्या बाबतीत मांडली. तसेच धनगर आरक्षणात ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, त्या दोघांना आम्ही पत्र दिल्याचे पडळकरांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा : Shiv Sena MLAs : ‘ते काम आमचं की विधानसभा अध्यक्षांचं?’ ठाकरेंचा कोर्टात खडा सवाल

रोहित पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार भाजपाचे बाप आहेत, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.या विधानावर प्रत्युत्तर देताना गोपिचंद पडळकर म्हणाले की, रोहित पवाराला हे माहित नाही, शरद पवारांसारखी 500 लोक संपूर्ण देशात भाजपात आहेत. हे कुठल्या कोपऱ्य़ात पिल्लू बसेल, हे पण कळणार नाही, अशी खिल्ली पडळकरांनी उडवली. महाराष्ट्रात चालतं म्हणून ते बोलत राहतात. सध्या त्यांचा भावनिक टायमिंग आहे. 2024 ला हे दिसतील परंतू 2029 ला हा पक्ष आणि ही लोक तुम्हाला दिसणार नाहीत,अशी भविष्यवाणी देखील गोपिचंद पडळकरांनी केली आहे.

Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की…