शिंदे गटाच्या आमदाराचा मतदारसंघ धोक्यात? भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट

Gopichand Padlkar यांनी प्रत्यक्षपणे आपली उमेदवारी जाहीर केल्याचीही चर्चा.
Gopichand Padlakar
Gopichand Padlakar Mumbai Tak

(Bjp mla gopichand padalkar on shinde group mla anil babar constituency)

सांगली : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार अनिल बाबर यांचा मतदारसंघ धोक्यात आला आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. त्याच कारण म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बाबर हे खानापूर-आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, असा गौप्यस्फोट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. तसंच खानापूर-आटपाडी मतदार संघात 2024 मध्ये भाजपाचा उमेदवार असेल असं म्हणतं त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली उमेदवारी जाहीर केल्याचीही चर्चा आहे.

खानापूर तालुक्यातील मोही येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी आयोजित सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या बाबतीत काही गौप्यस्फोट केले.

पडळकर म्हणाले, केवळ 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे अनिल बाबर आमदार झाले. तसंच आपण त्यावेळी बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवत होतो, त्यावेळी बारामती क्लब हाऊसमध्ये भल्या पहाटे अनिल बाबर आणि त्यांचे जेष्ठ सुपूत्र अमोल बाबर भेटायला आले होते. त्यांनी पाठिंबा मागताना 2024 ची विधानसभा निवडणूक आमदार बाबर लढवणार नसल्याचा शब्द दिला आहे. त्याऐवजी त्यांनी इथून भाजपला पाठिंबा देण्याचाही शब्द दिला आहे.

त्यामुळे 2024 ला अनिल बाबर निवडणूक लढवणार नाहीत. इथून भाजपचा उमेदवार असणार आहे, असंही पडळकर यांनी स्पष्ट केलं. मात्र यातून अप्रत्यक्षपणे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत खानापूर आटपाडी मतदारसंघात भाजपाचा उमेदवार आपणच असणार असल्याच त्यांनी जाहीर केल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in