महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतावर भाजपचा आक्षेप; कोर्टात जाण्याची शक्यता

मुंबई तक

मुंबई: राज्यसभेसाठी सकाळापासून मतदान सुरु आहे. २७८ आमदारांनी आतापर्यंत मतदान केलेले आहे. भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतावर आक्षेप घेतला गेला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि नाशिकचे आमदार सुहास कांदे यांच्या मतावर भाजपने आक्षेप घेतला आहे. परंतु मविआची २ मतं बाद करण्याची भाजपची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. म्हणूनच आता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यसभेसाठी सकाळापासून मतदान सुरु आहे. २७८ आमदारांनी आतापर्यंत मतदान केलेले आहे. भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतावर आक्षेप घेतला गेला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि नाशिकचे आमदार सुहास कांदे यांच्या मतावर भाजपने आक्षेप घेतला आहे. परंतु मविआची २ मतं बाद करण्याची भाजपची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. म्हणूनच आता भाजप न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे.

यशोमती ठाकूर यांनीही मुंबई तकशी बोलताना सांगितले की भाजपची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. भाजपाला पराभव समोर दिसत आहे म्हणून भाजप असले काहीतरी करत असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. परंतु भाजप कोर्टात जाण्याची शक्यता आहे. भाजप नेते पराग अळवणी यांनीही याबाबत आक्षेप घेतला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी जितेंद्र आव्हाडांनी मतदान केल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. मतदान मतपत्रिका दाखवायची असते ती हाताळायला द्यायची नसते यावर भाजपचे पराग अळवणी यांनी हरकत घेतली होती. तसेच काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनीही अशाच पद्धतीने नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली या दोन्ही मुद्द्यांवर भाजपने हरकत घेतली आहे. ही दोन्ही मतं बाद करावी अशी भाजपची मागणी आहे. मात्र ही मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. आतापर्यंत झालेली सर्व मंत वैध आहेत असं निवडणूक अधिकारी म्हणाले आहेत.

आज सकाळपासूनच विधान भवनात मतदानाला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि अपक्ष असे सर्वच आमदार एकापाठोपाठ एक मतदानासाठी येत आहेत. राज्यसभेत खरी लढत ही शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात आहे. सहावी जागा निवडणूक आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाच वाजेपर्यंत विजयी उमेदवाराचे नाव समोर येईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp