Advertisement

वादग्रस्त आमदार टी. राजा यांना भाजपनं केलं निलंबित; 'त्या' विधानावरून पोलिसांनीही केली अटक

भाजपने तेलंगणाचे आमदार टी राजा यांना पक्षातून निलंबित केले आहे.
Telangana BJP MLA
Telangana BJP MLA

भाजपने तेलंगणाचे आमदार टी राजा यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावून पक्षातून बाहेर का काढू नये, याचे १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. टी राजा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांना हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली.

विविध ठिकाणी तक्रारी दाखल

टी. राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाष्य केले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. एवढेच नाही तर डबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मीर चौक पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने लोक तक्रारी दाखल करण्यासाठी आले होते. यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे संतप्त लोकांनी सांगितले.

कॉमेडियन मुनवर फारुकीवरही अभद्र टिपण्णी

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील अनेक भागात निदर्शने सुरू झाली. त्याच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि त्याच्या आईवरही भाष्य केले आहे.

भाजपचे टी राजा सिंह हे गोशामहलचे आमदार

टी. राजा सिंह हे हैदराबादच्या गोशामहल मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. याप्रकरणी त्यांना पोलिस कोठडीही सुनावण्यात आली होती. आमदार टी राजा सिंह यांनी मुनव्वर फारुकीचा शो रद्द करण्याबाबत इशारा दिला होता. त्यामुळे यानंतर सुमारे 50 लो. कार्यक्रमस्थळी पोहोचले होते, मात्र सर्वांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले होते.

नुपूर शर्मानंतर टी. राजा

टी. राजाआधी नुपूर शर्मानेही एका टीव्ही चॅनलवर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर देशभरातून त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. त्याच्यावर देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पैगंबर यांच्यावरील वक्तव्यावरून वाढत्या वादानंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

भाजप प्रदेशाध्यक्षांनाही ताब्यात घेतले

तेलंगणा पोलिसांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय कुमार यांना ताब्यात घेतले आहे. संजय कुमार हे करीमनगरचे खासदार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के.कविता यांच्याविरोधात भाजप सातत्यानं निदर्शनं करत आहे. भाजप के. कविता यांच्यावर दिल्लीतील दारू घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप करत आहे. याप्रकरणी त्यांच्या घराबाहेर निदर्शने सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in