Uddhav Thackeray : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार? उद्धव ठाकरेंचं भाकीत
मुंबई : राज्यातील मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्तविलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती, याच बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच या संभाव्य […]
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यातील मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्तविलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती, याच बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांनाही तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आमदार मनिषा कायंदे आणि खासदार अरविंद सावंत यांनी माहिती दिली.
मनिषा कायंदे म्हणाल्या, आपल्याला माहिती आहे की शिवसेनेची पहिल्यापासूनची बांधणी अशी आहे की, मुंबईतले जे पदाधिकारी असतात त्यांना मातोश्रीवरील पक्षाचे महत्वाचे निरोप असतात ते संपर्क प्रमुखांना पाठवले जातात. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ही पद्धत चालू आहे. त्यानुसार आज बैठक झाली.
गुजरातमधील निवडणूक जाहीर झाली आहे, त्यापूर्वी महाराष्ट्रातील चार प्रकल्प इथून गुजरातला पळवले. सोबतच पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी एक खास पॅकेज जाहीर केले, परंतु त्यात नवीन कोणतीही प्रकल्प नाहीत. रेल्वे आणि रस्त्यांचही नवं पॅकेज नाही. काहीतरी घोषणा करायची. यातून एक अर्थ असाही निघतो की यामुळे महाराष्ट्रात मध्यावती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहेच. हेच भाकीत उद्धव ठाकरेंनी वर्तवली आहे.