“मुख्यमंत्री स्वतःसाठी ११ वेळा दिल्लीला गेले, एकदा महाराष्ट्रासाठी..” फॉक्सकॉनवरून आदित्य ठाकरे आक्रमक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःसाठी ११ वेळा दिल्लीला गेले होते. माझं त्यांना आवाहन आहे एकदा तरी महाराष्ट्रासाठी दिल्लीत जा आणि फॉक्सकॉनचा प्रकल्प वाचवा असं शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. दापोलीमधल्या सभेत आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. फॉक्सकॉन प्रोजेक्टबद्दल सुभाष देसाई खोटं बोलताहेत का? व्हायरल […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःसाठी ११ वेळा दिल्लीला गेले होते. माझं त्यांना आवाहन आहे एकदा तरी महाराष्ट्रासाठी दिल्लीत जा आणि फॉक्सकॉनचा प्रकल्प वाचवा असं शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. दापोलीमधल्या सभेत आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
फॉक्सकॉन प्रोजेक्टबद्दल सुभाष देसाई खोटं बोलताहेत का? व्हायरल बातमीमागचं सत्य काय?
फॉक्सकॉनवरून काय म्हणाले आदित्य ठाकरे?
महाराष्ट्रात रोजगाराच्या १ लाख संधी निर्माण करणारा फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात एक लाख संधी निर्माण झाल्या असत्या, मात्र हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यापाठोपाठ रोहा या ठिकाणी येणारा बल्क डकचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. खोके सरकार गणेश उत्सवात व्यस्त असल्याने त्यांना महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही अशीही खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली.
एकनाथ शिंदेंना उद्देशून काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मला एक प्रश्न पडलाय की हे खोके सरकार चाललंय तरी कसं? दोन प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले आहेत पहिला प्रकल्प आहे वेदांता फॉक्सकॉन हे तुम्हाला माहित आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना आणि उद्योग मंत्र्यांना माहित नाही. आज मी संवाद साधतो आहे त्याचं कारण हेच आहे की जे काही राज्यात सुरू आहे ते मला पटत नाही.