उर्फीच्या कपड्यांचा वाद पेटला! रुपाली चाकणकर चित्रा वाघांच्या ‘रडार’वर
एरवी सोशल मीडियावर चर्चेचा विषय असणारी उर्फी जावेदची वेशभूषा आता महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनलीये. उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सातत्यानं टीका करताहेत. तर त्यावर उर्फी जावेदकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. उर्फी जावेद-चित्रा वाघांचा वाद आता राज्याच्या महिला आयोगापर्यंत जाऊन पोहोचलाय. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर चित्रा वाघांनी […]
ADVERTISEMENT

एरवी सोशल मीडियावर चर्चेचा विषय असणारी उर्फी जावेदची वेशभूषा आता महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनलीये. उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सातत्यानं टीका करताहेत. तर त्यावर उर्फी जावेदकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. उर्फी जावेद-चित्रा वाघांचा वाद आता राज्याच्या महिला आयोगापर्यंत जाऊन पोहोचलाय. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर चित्रा वाघांनी निशाणा साधलाय.
उर्फी जावेदच्या फॅशनची आणि बोल्ड फोटोंची चर्चा सोशल मीडियावर नेहमीचीच झालीये. पण, भाजपच्या नेत्या चित्रा वाघांनी उर्फीच्या बोल्डनेसवरच बोट ठेवलंय. चित्रा वाघांनी उर्फीच्या वेशभूषेला नंगटपणा म्हणत अटकेची मागणी केली. यावरून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला. सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिल्यानंतर चित्रा वाघांनी आता राज्य महिला आयोगाला सवाल केलेत.
चित्रा वाघांचे राज्य महिला आयोगाला सवाल
चित्रा वाघांनी ट्विट केलंय. त्या म्हणतात, “भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?”, असा प्रश्न चित्रा वाघांनी विचारला आहे.
‘संजय आठवतोय का?’, उर्फी जावेदनं ठेवलं चित्रा वाघ यांच्या वर्मावर बोट