‘हे कोणीही कधीही विसरू नये’, चित्रा वाघांनी चाकणकरांना पुन्हा डिवचलं
उर्फी जावेदच्या (Urfi Javed) वेशभूषेवरून सुरू झालेला वादाने महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Politics) स्वरूप घेतलं आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांविरुद्ध आक्रमक झालेल्या चित्रा वाघांनी (Chitra Wagh) महिला आयोगाच्या माध्यमातून अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना लक्ष्य केलं. त्यानंतर रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक वार-पलटवार होताना दिसत आहे. दरम्यान, चित्रा वाघांना राज्य महिला आयोगाने (maharashtra […]
ADVERTISEMENT

उर्फी जावेदच्या (Urfi Javed) वेशभूषेवरून सुरू झालेला वादाने महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Politics) स्वरूप घेतलं आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांविरुद्ध आक्रमक झालेल्या चित्रा वाघांनी (Chitra Wagh) महिला आयोगाच्या माध्यमातून अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना लक्ष्य केलं. त्यानंतर रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक वार-पलटवार होताना दिसत आहे. दरम्यान, चित्रा वाघांना राज्य महिला आयोगाने (maharashtra women’s commission) नोटीस बजावण्यात आली. त्याला उत्तरही चित्रा वाघांनी उत्तर दिलं असून, त्यानंतर केलेल्या ट्विटमधून पुन्हा एकदा चाकणकरांना डिवचलंय.
तोकडे कपडे घालून मुंबईत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघांनी केलेली आहे. मुंबई पोलिसांकडे तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही चित्रा वाघांनी केलीये. त्याचबरोबर महिला आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करण्याची भूमिका चित्रा वाघांनी मांडली होती. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्या सुप्त संघर्ष सुरू झाला.
चित्रा वाघांनी महिला आयोगाला सवाल केले होते. त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघांना नोटीस बजावली होती. या नोटिसीला चित्रा वाघांनी उत्तरही दिलं. उत्तर दिल्यानंतर एक ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय.
ऊर्फीला अंगप्रदर्शन भोवणार? चित्रा वाघ भेटल्या पोलीस आयुक्तांना, म्हणाल्या…