शिवसेनेत उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे गट, शिवसैनिक संभ्रमात

मुंबई तक

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. शिवसेनेचा नैसर्गिक मित्र भाजपच आहे आणि आपण त्यांच्यासोबतच गेलं पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी घेतली आहे. यानंतर घडलेलं सत्तानाट्य सगळ्या देशानं पाहिलं. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनाही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. शिवसेनेचा नैसर्गिक मित्र भाजपच आहे आणि आपण त्यांच्यासोबतच गेलं पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी घेतली आहे. यानंतर घडलेलं सत्तानाट्य सगळ्या देशानं पाहिलं.

आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनाही स्थान दिलं जाणार आहे. शिवसेनेत आता उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

शिवसेनेत उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे दोन गट, कार्यकर्ते संभ्रमात

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेना सोबत जोडले गेले. संघर्ष करत सेना वाढवली. त्यानंतर अनेक कार्यकर्ते निवडणुकीत विजय संपादन करून विधानसभेत गेले तर काही जण संसदेत गेले. मात्र कालांतराने यवतमाळ जिल्हा शिवसेनेत आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी असे दोन गट निर्माण झाले. त्यात कार्यकर्ते ही विभागले गेले. मग दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहायला लागले. त्यात नेत्याकडून ही बरेचवेळा दुजाभाव व्हायला लागला.

आता आमदार आणि खासदार हे दोन्ही नेते शिंदे गटात सहभागी झाले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून काम केले तर जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा फायदा होऊ शकतो. संजय राठोड यांच्या कार्यशैलीने त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp