Mumbai Tak /बातम्या / ‘एकनाथ शिंदे मेहनती…’ : बाळासाहेब थोरातांनी केलं मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक
बातम्या राजकीय आखाडा राजकीयआखाडा

‘एकनाथ शिंदे मेहनती…’ : बाळासाहेब थोरातांनी केलं मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक

Chief Minister Eknath Shinde news :

नाशिक : “शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री आहात. संधी मिळाली आहे, काम करत आहात. आता आमची संधी घालवली, पण गडी मेहनती हे काही विसरुन जाता येत नाही. जो वेळ मिळाला, जी संधी मिळाली त्यात तुम्ही लोकांसाठी काम करत आहे, हे आम्ही पाहतोय आणि ते नाकारता येत नाही”, असं म्हणतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं तोंडभरुन कौतुक केलं. (Congress leader Balasaheb Thorat praised Chief Minister Eknath Shinde)

ते नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे बोलत होते. नांदूर शिंगोटे येथे आज (18 मार्च) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील अनेक मंत्र्यांसह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

मी एकदा गोपीनाथ मुंडेंकडे गेलो होतो. त्यांनी मला जवळ बसवून घेतलं. पुढे शिष्टमंडळ बसवून घेतलं. मी समस्या सांगितली, त्यावर त्यांनी पुढच्या ८ दिवसांत तोडगा निघेल, काळजी करु नका, असं आश्वासन दिलं. त्यांनी असं बघितलं नाही की मी काँग्रेसचा आमदार आहे. त्यांनी हे पाहिलं की एक लोकप्रतिनिधी येतो आणि आपल्याला शेतकऱ्यांचा व्यथा सांगतो, ते सोडवणं आपलं काम आहे अशी भूमिका त्यांनी घेतली.

मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर हे दगड का ठेवलेत? त्यांना काय म्हणतात?

मला आठवतं पंकजाताई मंत्री होत्या आणि दुपारी १२ च्या सुमारास जलसंधारणाच्या कामावर गेल्या. यावेळी त्यांनी एक सेल्फी काढला. माध्यमांनी चालवलं, मंत्र्यांना दुष्काळाचं गांभीर्य नाही, सेल्फी काढतात, वगैरे. यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी माझ्याकडे आले. मी त्यांना त्यावर एवढचं म्हटलं की एक तरुण मंत्री जर दुपारी बाराच्या उन्हात काम करत असेल आणि उत्साहाने सेल्फी काढतं असेल तर त्यात वावगं काही नाही. मला त्यावेळी गोपीनाथ मुंडे आठवले. काम करत असताना राजकारण बाजूला ठेवायचं ही गोष्ट ते शिकवून गेले आहेत, असही थोरात म्हणाले.

बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार?