मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण, कमलनाथ यांनी दिली माहिती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला आहे ही माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिली आहे. शिवसेनेच्या सूत्रांनीही ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालेला असताना ही माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे आमदारांचा एक मोठा गट सोबत घेऊन बंड पुकारत आसामला गेले आहेत. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर हे सत्तानाट्य मंगळवारी घडलं. […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला आहे ही माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिली आहे. शिवसेनेच्या सूत्रांनीही ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालेला असताना ही माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे आमदारांचा एक मोठा गट सोबत घेऊन बंड पुकारत आसामला गेले आहेत. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर हे सत्तानाट्य मंगळवारी घडलं.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देतील अशी माहिती समोर येत होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना वर्षावर येऊ नका असं सांगण्यात आलं आहे.तसंच सगळ्यांना फोनवरून संपर्क साधण्यास सांगितलं आहे.
Eknath Shinde: उद्धव ठाकरे सरकार वाचवू शकतील का? महाराष्ट्र विधानसभेचं गणित प्रचंड रंजक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना संसर्ग झाला असला तरीही त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस कमलनाथ यांच्याशी बोलणं झालं त्यांनी मला उद्धव ठाकरेंना कोरोना झाल्याची माहिती दिली असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुख्मयंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी कोरोना झाला आहे. आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते व्हर्च्युअली सहभागी होतील. विधानसभा बरखास्तीचा विचार नाही सरकार पूर्ण ताकदीने चालवणार असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.