PM Modi: ‘एकटा किती जणांवर भारी पडतोय’, मोदींनी थेट छाती ठोकून ठणकावलं!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PM Modi Speech Rajyasabha Speech: नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यसभेत (Rajyasabha) विरोधकांवर प्रचंड ताशेरे ओढले. सुमारे 85 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नेहरू-गांधी कुटुंब, कलम 356, नोकरी-बेरोजगार असे अनेक मुद्दे उपस्थित केले. (country is seeing that one alone is heavy on many pm modi said by thumping his chest amid opposition slogans)

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘ज्यांना सत्तेशिवाय दुसरे काही दिसत नाही त्यांनी अर्थनितीला अनर्थनितीमध्ये बदलून टाकलं. या सभागृहाचं गांभीर्य समजून घ्या.. मी त्यांना सांगू इच्छितो, आपापल्या राज्यात जा आणि समजावून सांगा की चुकीच्या मार्गावर जाऊ नका, शेजारील देशांची स्थिती पाहा त्यांनी कशीही कर्ज घेऊन आज त्या देशांची काय अवस्था झालीए.’

PM Modi: ‘काल काही लोक उड्या मारत होते’, मोदींचे राहुल गांधींना टोमणे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा पंतप्रधान मोदी राज्यसभेतील भाषणात

‘आजूबाजूचे देश बघा, जगात आता त्यांना कोणीही त्यांनाकर्ज द्यायला तयार नाही, ते संकटातून जात आहेत. त्यामुळे देशाच्या आर्थिक आरोग्याशी खेळू नका. तुमच्या मुलांचे हक्क हिरावून घेणारे असे कोणतेही पाप करू नका.’

पंतप्रधान मोदींच्या भाषणातदरम्यान विरोधकांची जोरदार घोषणाबाजीही सुरू होती. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ‘सामाजिक न्याय, दोन वेळचं अन्न यासारखे प्रश्न आम्ही सोडवले आहेत, तुम्ही ते सोडवले नाही. स्वतंत्र भारताची स्वप्ने पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे.’ यावेळी पंतप्रधान मोदींनी छाती ठोकून म्हटले की, ‘देश पाहतो आहे की एक व्यक्ती किती जणांना भारी पडतोय… तरीही आवाज दाबला जात नाही.’

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आदरणीय अध्यक्ष महोदय, हे दृढनिश्चयामुळे झाले आहे. मी देशासाठी जगतो, मी देशासाठी काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच राजकीय खेळ खेळणाऱ्या लोकांमध्ये ही हिंमत नाही, ते सुटकेचा मार्ग शोधत आहेत.’

ADVERTISEMENT

‘त्यांच्याकडे माती होती, माझ्याकडे गुलाल होता’

यापूर्वी पीएम मोदी म्हणाले की, ‘गेल्या अनेक दशकांमध्ये अनेक विचारवंतांनी याच सदनातून देशाला दिशा दिली आहे. या सदनात असेही लोक बसलेले आहेत ज्यांनी आयुष्यात अनेक यश मिळवले आहे. सभागृहात जे घडते ते देश ऐकतो आणि गांभीर्याने घेतो. मात्र सभागृहातील काही लोकांच्या वागण्या-बोलण्याने सभागृहाचीच नव्हे, तर देशाचीही निराशा होत आहे, हे दुर्दैवी आहे.’

विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मानानीय सदस्यांना मी सांगू इच्छितो की, त्यांच्याकडे चिखल होता आणि माझ्याकडे गुलाल आहे.’ ज्याच्याकडे जे होतं, ते त्याने उधळलं. तुम्ही जितका चिखल उधळाल तेवढेच कमळ फुलतील.. त्यामुळे कमळ फुलविण्यासाठी तुमचं जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदान आहे त्याबाबत मी कृतज्ञता व्यक्त करतो.’

PM मोदी लोकसभेत फक्त काँग्रेसवरच बरसले, पण अदाणींवर…

‘…त्यांचे नाव श्रीमती इंदिरा गांधी’

केंद्रातील सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘इतिहास पाहा की, कलम 356 चा सर्वाधिक गैरवापर करणारा कोणता पक्ष होता. निवडून आलेली सरकारे 90 वेळा पाडली गेली, एका पंतप्रधानाने कलम 356 हे तब्बल 50 वेळा वापरले, त्यांचे नाव श्रीमती इंदिरा गांधी आहे.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT