राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांना कोरोना; मतदानाचं काय होणार?

Devendra fadnavis covid positive : मागील दोन-तीन दिवसांपासून ठिकठिकाणी भेटी, अनेक आमदार, नेत्यांशी संपर्क
राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांना कोरोना; मतदानाचं काय होणार?

राज्यसभा निवडणुकीसाठी आमदारांच्या मतांची बेरीज सुरू असतानाच भाजपची चिंता वाढली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून फडणवीस दौऱ्यावर असून, त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

राज्यात राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यात भाजपनं महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर दोन्ही बाजूंनी आमदारांच्या मतांची जुळवा जुळव सुरू आहे.

एकीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी रणनीती, तर दुसरीकडे राज्यभर कार्यक्रमांना हजेरी अशा दुहेरी भूमिकेत फडणवीस व्यस्त आहेत. त्यात आज लातूर दौऱ्यावर असतानाच फडणवीसांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.

राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांना कोरोना; मतदानाचं काय होणार?
सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत, शरद पवारांचा मोदींना टोला

एकीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी रणनीती, तर दुसरीकडे राज्यभर कार्यक्रमांना हजेरी अशा दुहेरी भूमिकेत फडणवीस व्यस्त आहेत. त्यात आज लातूर दौऱ्यावर असतानाच फडणवीसांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिलीये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असून, संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.

राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांना कोरोना; मतदानाचं काय होणार?
राज्यसभेसाठी २४ वर्षानंतर मतदान; १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार कसा पडला होता?

अनेक आमदार, नेते संपर्कात

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याचं निदान झाल्यानंतर अनेक आमदारांची चिंता वाढली आहे. देवेंद्र फडणवीस मागील दोन तीन दिवसांपासून दौऱ्यावर आहेत. त्यांनी पनवेल, पुणे, लातूर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना फडणवीस उपस्थित होते.

महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला गेले होते. याबैठकीला छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई, चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

पनवेल येथील महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आणि विकास कामांचं लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंगजी बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.

लातूर दौऱ्यातही फडणवीसांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. दौऱ्यादरम्यान आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार हे फडणवीस यांच्यासोबत होते. त्यामुळे आता आमदारांना आणि नेत्यांनाही चाचणी करावी लागणार आहे.

फडणवीसांना मतदान करता येणार का?

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यामुळे त्यांना मतदान करता येणार का, असा प्रश्न उपस्थित होतं आहे. यापूर्वी राज्यात झालेल्या काही निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने कोरोना रुग्णांना मतदान करता यावं म्हणून स्वतंत्र व्यवस्था केली होती.

गेल्या वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आयोगाने कोरोना रुग्णांना मतदान करता यावं म्हणून मतदानाच्या वेळेतील अखेरचा काही वेळ रुग्णांसाठी ठेवला होता.

करोनाबाधित रुग्ण आणि विलगीकरण वार्डातील व्यक्ती, तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचं तापमान ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी ठरवून देण्यात आली होती. प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करू देण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता.

अलिकडेच उत्तर प्रदेशसह काही राज्यांत झालेल्या रुग्णांनाही पीपीई किट घालून मतदान केंद्रावर सोडण्यात आलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे आता सगळं लक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे असणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in