द्रौपदी मुर्मू यांना आमचा पाठिंबा आहे, योग्य व्यक्तीचे समर्थन केले- संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: राष्ट्रपतीपदाची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे. येत्या १८ तारखेला निवडणूक पार पडणार आहे तर २१ तारखेलानिकाल लागणार आहे. आज NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मु मुंबईमध्ये आहेत. त्या भाजप आणि मित्रपक्षांच्या आमदार खासदारांशी संवाद साधणार आहेत. Sanjay Raut यांनी शिवसेनेने खासदार संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की राष्ट्रपती पदासाठीसाठी द्रौपदी मुर्मू यांना आमचापाठिंबा आहे. योग्य व्यक्तीला आम्ही समर्थन केले आहे. कोणत्याही राजकीय फायद्यासाठी समर्थन केलेले नाही. महाराष्ट्रमध्ये अनेक ठिकाणी आदिवासी आहेत. आमचे शिवसेनेचे लोक देखील आदिवासी समाजामध्ये काम करत आहे त्यांनी देखील समर्थनदर्शवले आहे.

काही असंसदीय शब्दांवर बंदी घालण्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले “ह्या शब्दांवर बंदी घालण्याची वेळसरकारवर का आली? कारण हे सर्व शब्द भविष्यात सरकारविरोधात वापरले जाऊ शकतात या भीतीतून हे झालंय का? यादेशातला भ्रष्टाचार संपूर्णपणे संपलाय का? विधीमंडळ, स्थानिक स्वराज्य, पालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तरी शब्द वापरायचानाही? ही कुठली हुकूमशाही? असे सवाल संजय राऊत यांनी विचारले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT